ETV Bharat / city

Pune Traffic Police : बस चालकाला वाहतूक पोलिसाकडून शिवीगाळ, व्हिडिओ झाला व्हायरल - बस ड्रायव्हर आणि वाहतूक पोलिसांचा वाद

पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकात बस चालक आणि वाहतूक पोलिसांत वाद झाला आहे. या वादात वाहतूक पोलिसांनी बस चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच, शिवनेरी बसची काचही फोडली. याप्रकरणी बसचालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

बस चालकाला वाहतूक पोलिसाकडून शिवीगाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

author img

By

Published : Dec 9, 2021, 12:31 PM IST

पुणे - पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का चौकात बस चालक आणि वाहतूक पोलिसांत वाद झाला आहे. या वादात वाहतूक पोलिसांनी बस चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ( The traffic police Bus Driver ) तसेच, शिवनेरी बसची काचही फोडली. ( Pune Traffic Police Case ) याप्रकरणी बसचालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, ही घटना बसमधील प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली असून, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ
बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दाखल

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. ( Bus driver video viral ) दरम्यान, चालक बाळकृष्ण फुलसुंदर यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम फड यांनी सांगितले की, मालधक्का चौकात शिवनेरी बसच्या नुकसानीबाबत आमच्याकडे तक्रार दिली असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण ?

सायंकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान पुणे स्टेशन एसटी आगार येथून दादर-शिवनेरी बस बाहेर पडली. त्यानंतर मालधक्का चौकाकडे गाडी वळवून घेत असतानाच सिग्नलवरून पोलिसांनी बसचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाहतूक पोलिसांनी बसचालकाला आई-बहिणीवरून अर्वाच्य शिवीगाळही केली. त्यानंतर चालकाला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, चालक बस बाजूला घेत नसल्याचे बघून वाहतूक पोलिसाने शिवनेरी गाडीचा वायपर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थेट गाडीच्या काचेवर दगड मारला.

हेही वाचा - Bipin Rawat passes away : सीडीएस पद मोकळं ठेवण धोकादायक - ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.