ETV Bharat / city

पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ - पुणे महापालिका बातमी

पुण्यात कोरोनाग्रस्तपेक्षा रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पूर्वी कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारादरम्यान मोबाईल वापरण्याची परवानी नव्हती. मात्र, नंतर मोबाईल वापरण्याला परवानगी देण्यात आली. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मनोबलात वाढ होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर विविध उपाययोजनाही करण्यात आले आहेत. याबाबत काही जणांनी 'ईटीव्ही भारत'ला आपला अनुभव सांगितला आहे.

PMC
पुणे महापालिका
author img

By

Published : Aug 17, 2020, 4:39 PM IST

पुणे - पुण्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद ९ मार्चला झाली होती. त्यानंतर आता पाच महिन्यानंतर कोरोनाबधितांची संख्या 74 हजारांवर गेली आहे. यातील सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण संख्या 14 हजार 700 इतकी आहे. ही एकूण आकडेवारी पाहता, मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्याची संख्या वाढण्याची कारणे काय असू शकतात याविषयी ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट..

महापालिकेच्या डॉक्टरांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, कोरोना चाचणीचे प्रमाण वाढले आहे. दररोज 6 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जातात. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट केली जाते. खूप कमी कालावधीत हे सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात. अशावेळी रुग्णांमध्ये खूप कमी लक्षणे असतात, किंवा लक्षणे नसतातच. त्यामुळे असे रुग्ण झपाट्याने बरे होतात.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांचा कुटुंबियांशी संपर्क होत नव्हता. आता रुग्णांना मोबाईल जवळ बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण सातत्याने कुटुंबांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले जाते. याचा परिणाम असा होतो की ते झपाट्याने बरे होतात.

सध्या पुणे शहरात महापालिकेची 30 कोविड सेंटर आहेत. यातील बहुतांश सेंटरमध्ये समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाचे मानसिक संतुलन ढळू न देण्याचे काम हे समुपदेशक करतात. याशिवाय शहरात आता 3 हजारांहून अधिक ऑक्सिजन बेड तर 450 व्हेंटिलेटर बेड आहेत. याचाही वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोरोनाबाधित रुग्णांच्या आहारातही बदल करण्यात आला असून व्हिटॅमिन-सीचे प्रमाण अधीक असणारे अन्नपदार्थ व गोळ्या त्यांना दिले जातात. त्यामुळे या सर्व उपाययोजनांचा परिणाम म्हणून कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.

कोरोनामुक्त झालेले पोलीस कर्मचारी साबळे आपला अनुभव सांगताना म्हणाले, कोरोना झाल्यावर काय त्रास होतो याच्या बातम्या आधी टीव्हीवर पाहिल्या होत्या. त्यामुळे सुरवातीला कोरोना झाल्याचे समजल्यानंतर भीती वाटली. परंतु रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी धीर दिला, कशाप्रकारे काळजी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन केले. यामुळे मी ठणठणीत बरा होऊन घरी परतलो असल्याचेही ते म्हणाले.

नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील कोरोना झाला होता. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, कोरोना झाल्यानंतर घाबरुन न जाता आहार चांगला घ्यावा. वेळच्यावेळी जेवण केले. झोप पुरेशी घेतली प्रोटीन मिळणारे जेवण घेतले. व्हिटॅमिन-सीच्या गोळ्या घेतल्या तर नक्की या रोगावर मात करता येईल. या रोगावर सर्वात चांगला आणि सोपा उपाय कुठला असेल तर तो विलगिकरणाचा आहे. ज्यांना आधीच कुठले आजार आहेत, अशांनी मात्र रुग्णालयातच उपचार घ्यावेत. त्यामुळे कोरोना हा आजार बरा होणारा आहे. मात्र, त्याचे निदान वेळीच होणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.