ETV Bharat / city

Pune International Marathon : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 35 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रात्री 12 वाजता - अॅड. अभय छाजेड - Half Marathon

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ३५वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ( Pune International Marathon ) शनिवारी (२६ फेब्रुवारी) रात्री १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन ( Night Marathon ) आयोजित करण्यात आली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन
author img

By

Published : Feb 26, 2022, 5:28 PM IST

पुणे - सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ३५वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ( Pune International Marathon ) शनिवारी (२६ फेब्रुवारी) रात्री १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

माहिती देताना अॅड. अभय छाजेड

मॅरेथॉनमध्ये परदेशातील ३० धावपटू व देशातील २ हजार ५०० धावपटू सहभागी होणार - या अभिनव मध्यरात्र मॅरेथॉनमध्ये परदेशातील ३० धावपटू व देशातील २ हजार ५०० धावपटू सहभागी होत आहेत. ४२.१९५ किलोमिटरचा पुरूष व महिला गट, २१ किलोमिटरचा ( Half Marathon ) पुरूष व महिला गट (अर्ध मॅरेथॉन), १० व ५ किलोमिटरचा पुरुष व महिला, ३ किलोमिटरचा व्हील चेअर अशा विभागात ही स्पर्धा होणार आहे. यासाठी सर्व विभागातील पुरुष व महिला विजेत्यांना रोख बक्षीसे, स्मृती चिन्हे प्रशस्तीपत्रे दिले जातील, अशी माहिती यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी दिली.

असा असेल मॅरेथॉनचा मार्ग - ३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ( Pune International Marathon ) रात्री १२ वाजून १ मिनिटांनी सारसबागेजवळील भाऊराव सणस क्रीडा मैदान ( Baburao Sanas Sports Ground ) येथून सुरू हाईल. सणस मैदा-बाजीराव रस्ता-शनिपार-अप्पा बळवंत चौक- शनिवार वाडा-नवा पुल-रामसर बेकरी चौकातून परत याच मार्गानि वळून बाजीराव रस्ता-सणस मैदान, सिंहगड रस्ता-दांडेकर चौक- गणेशमळा- संतोष हॉल-गोयल गंगा चौक-लोकमत भवन व तेथून परत सणस मैदान ही पहिली २१ किलोमिटरची फेरी होईल व पुन्हा त्याच मार्गाने २१ किलोमिटरची दुसरी फेरी पूर्ण करून सर्व धावपटू स्पर्धक सणस मैदानात स्पर्धा पूर्ण करतील. पुरुष व महिलांसाठीची अर्ध-मरेथॉन (२१ किलोमिटर) ही त्याच मार्गाने पहिली फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे संपणार आहे. यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता या १० किलोमिटर पुरुष व महिला स्पर्धा सणस मैदान येथून निघेल ती महालक्ष्मी चौक (सारस बाग)-दांडेकर चौक-गणेशमळा-संतोष हॉल येथून परत त्याच मार्गे सणस मैदान येथे संपेल. तर व्हिलचेअरची ३ किलोमिटरची शर्यत सकाळी सव्वासहा वाजता सणस मैदान महालक्ष्मी चौक (सारस बाग)-सिंहगड रस्ता-दांडेकर चौकातून परत सणस मैदान येथे संपेल, असेही यावेळी छाजेड म्हणाले.

स्पर्धेत विशेष घेण्यात आली आहे काळजी - या स्पर्धेसाठी विविध प्रकारच्या सेवा देणारे एक हजार मॅरेथॉन कार्यकर्ते (पंच, रूट अंपायार, पायलट, सायकल पायलट, मेडिकल स्टाफ) काम करत असून या संपूर्ण मार्गावर एकूण ७ ठिकाणी वैद्यकिय सेवा केंद्रे उपलब्ध असतील. त्यासाठी ५० डॉक्टर व २०० नर्सिंग स्टाफ काम करणार आहेत. तसेच संपूर्ण मार्गावर पिण्याचे पाणी, एनर्जी ड्रींक, ज्युसेस, स्पंजिंग बुथ याची तांत्रिक नियमानुसार व्यवस्था करण्यात येणार आहे. पर्यावरणपुरक धोरण म्हणून मोटार सायकल पायलट संख्या कमी करून अधिकाधिक सायकल पायलट असणार आहेत. तसेच रात्री मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा त्रास स्पर्धक व कार्यकर्त्यांना होऊ नये व ही मोकाट श्वान त्यांना चावू नयेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहितीही छाजेड यांनी दिली.

म्हणून मध्यरात्री ठेवण्यात आली मॅरेथॉन - पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने देशात मॅरेथॉन चळवळीचा पाया रचला गेला. त्यानंतर देशात अनेक मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. मध्यरात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनही देखील त्यानिमित्ताने देशाच्या क्रिडा क्षेत्राला मिळालेली नविन अनुभुती असणार आहे. मध्यरात्रीच्या या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमुळे वाहतूक कोंडी होणार नाही. पण, वर्षानुवर्ष मॅरेथॉन स्पर्धेचे प्रेक्षक म्हणून स्पर्धकांचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांना हा आनंद यावेळी घेता येणार नाही. पण, कोरोनाच्या परिस्थीत हा योग्य मार्ग निवडला गेला आहे, असेही यावेळी छाजेड म्हणाले.

हेही वाचा - Jayant Patil On Sambhajiraje Strike : संभाजीराजेंच्या उपोषणावर जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय केंद्र...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.