पुणे पुण्यातील इंजिनिअर प्रणय पाठोळे यांची टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी भेट घेतली Elon Musk meets Twitter friend Pranay Pathole. इलॉन मस्क यांनी ट्विट करत प्रणयसोबतचा फोटो पोस्ट केला Elon Musk meets Pranay Pathole आहे. तसेच नम्र आणि डाऊन टू अर्थ असे कॅप्शन दिले होते. प्रणय हा मस्क यांचा ट्विटरवरील मित्र आहे. ते दोघे गेल्या चार वर्षांपासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर नियमितपणे संवाद साधत Elon Musk meets Pune friend Pranay Pathole आहेत.
इलॉन मस्क यांनी घेतली पुण्यातील मित्राची भेट टेस्लाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. ट्विटरवर मस्क यांचे अनेक मित्र आहेत. चार वर्षांपूर्वी मस्क यांची एका भारतीयाशी मैत्री Elon Musk meet Pranay Pathole in pune झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. एका ट्विटवरून सुरू झालेला संवाद हळूहळू वाढू लागला. अखेर आता दोघांची भेट झाली. प्रणय पाठोळे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आहे.
ट्विटरवरून झाली होती ओळख २०१८ मध्ये प्रणय पाठोळे यांनी टेस्लाच्या ऑटोमॅटिक विंडस्क्रीन वायपर आणि पावसावेळी त्यात निर्माण होणाऱ्या समस्येबद्दल ट्विट केले होते. या ट्विटला मस्क यांनी उत्तर दिले. पुढच्या लॉन्चवेळी ही समस्या सोडवू, असे मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मस्क अनेकदा प्रणयच्या ट्विटवर कमेंट करायचे. यानंतर डायरेक्ट मेसेजच्या माध्यमातूनही दोघांमध्ये बातचीत सुरू झाली आणि आता तर दोघांची भेटही झाली आहे.