पिंपरी-चिंचवड - हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन चित्रीकरण करणे पुण्यातील एका गुन्हेगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 'त्या' गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयुर उर्फ यम सरोदे असे पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मयुर सरोदे हा एक गुन्हेगार आहे. त्याच्यावर भादवि 326 चा एक गुन्हा दाखल आहे. स्वतःला भाई आणि गुन्हेगार म्हणून मिरवून घेण्यासाठी मयुरने कोयत्या सोबत आपले व्हिडियो तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याने हा प्रकार परिसरात दहशत पसरविण्यासाठी केला असल्याचे म्हटले जात आहे.
मी कोण आहे हे सांगण्याची जगाला वेळ आली, असा डॉयलॉग बोलून मयुर हातात कोयत्यासारखे हत्यार घेतो. या क्षणाचे चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दुसऱ्या व्हिडिओत मयुर कोयता हातात घेऊन, आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात, असे म्हणताना पाहायला मिळत आहे.
मयुरचा हत्यारासोबतचा व्हिडिओ पिंपरी चिंचवड पोलिसांच्या निदर्शनात आला. तेव्हा त्यांनी तात्काळ आरोपी मयुरच्या मुसक्या आवळून अटक केली. मयुर विरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुरने चित्रिकरण करताना वापरलेले कोयते देखील पोलिसांनी जप्त केले आहे. मयुरचे अनुकरण इतर तरुणांनी करू नये, म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मयुर विरोधात तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली आहे.
हेही वाचा - Pune Municipal Corporation - अगोदर 'त्या' गावांंचा समावेश करण्यामुळे, तर आता विकास आराखड्यामुळे राजकारण तापल
हेही वाचा - पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा.. प्रवीण दरेकर यांचे सरकारवर टीकास्त्र