ETV Bharat / city

Ten Persian Cats Rescued In Pune : आग लागलेल्या इमारतीतून 10 पर्शियन मांजरांची सुखरूप सुटका

author img

By

Published : Jan 29, 2022, 10:06 PM IST

Updated : Jan 30, 2022, 12:21 AM IST

पुण्यातील घोरपडी पेठ येथे काल (दि. 28 जानेवारी)रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका तीन मजली इमारती घराला आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत अडकलेल्या 10 पर्शियन मांजरींची सुखरूप सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली आहे. यात 4 मोठी व 6 लहान पिल्ल्यांचा समावेश आहे.

10 पर्शियन माजरांची सुटका
10 पर्शियन माजरांची सुटका

पुणे - अग्निशमन विभागाने शुक्रवारी रात्री आग लागलेल्या तीन मजली इमारतीतून दहा पर्शियन मांजरींची सुटका केली आहे. काल (दि. 28 जानेवारी)रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका तीन मजली इमारती घराला आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येत आहे. या आगीत अडकलेल्या 10 पर्शियन मांजरींची सुखरूप सुटका अग्निशामक दलाच्या जवानांनी केली आहे. यात 4 मोठी व 6 लहान पिल्ल्यांचा समावेश आहे.

व्हिडिओ
10 पर्शियन मांजरींना सुखरूप काढलं बाहेर

पुण्याच्या घोरपडी पेठ येथील उर्दु शाळेजवळ एका तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर काल आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले जात आहे. आग मोठ्या प्रमाणात लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण ज्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती तिथे दहा पर्शियन मांजरी अडकले होते. जशी ही माहिती अग्निशामक जवानांना मिळाली तेव्हा त्यांनी या आगीत जाऊन या मांजरींना सुखरूप बाहेर काढले आहे. यात 4 मोठी व 6 लहान पिल्ले होती. धूर जास्त असल्याने या मांजरीच्या तोंडातून फेस येत होता पण जवानांनी यांना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती अग्निशामक दलाचे जवान प्रदीप खेडेकर यांनी दिली आहे.

जवानांचे खूप खूप आभार

घरमालक सॅम्युल मॅलेडीन हे गेल्या अनेक वर्षांपासून मांजरींचा व्यवसाय करत आहेत. नुकतेच त्यांनी 10 पर्शियन मांजरी हे आणल्या आहेत. जेव्हा आग लागली होती तेव्हा धूर खूप येत होता. याच घरात मांजरी असल्याने आत्ता या माजरांचे काय होणार अस वाटत असताना मी अग्निशामक दलाच्या जवानांना याबाबत माहिती दिली आणि त्यांनी या आगीत जाऊन या मांजरींना सुखरूप बाहेर काढले अशी माहिती मॅलेडीन यांनी दिली. या मांजरींना सुखरूप बघता मला खूप आंनद झाला असल्याची भावना मॅलेडीन याने यावेळी व्यक्त केली आहे. आग जेव्हा लागली तेव्हा सामाजिक कार्यकर्ते साहिल जाफरी यांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली आणि तात्काळ मदत देखील केली. जवानांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा -'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक

Last Updated : Jan 30, 2022, 12:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.