पुणे - पिंपरी चिंचवड शहरात राजकीय लढती अत्यंत रंगतदार स्थितीत आहेत. प्रत्येक पक्षातील उमेदवार प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. सकाळ पासून वंचित बहुजन आघाडी असेल किंवा राष्ट्रवादी पुरस्कृत विलास लांडे यांनी आजपासून प्रचाराचा प्रारंभ केला आहे. दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी दुचाकी रॅलीमध्ये सहभाग घेत आपल्या उमेदवाराला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी आरे संदर्भात आदित्य ठाकरेसह इतर नेत्यांवर निशाणा साधला आहे. वंचितचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज सुजात आंबेडकर यांनी दुचाकी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी बाळासाहेब गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. लांडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली. मुंबईमध्ये आरे वृक्ष तोडीचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय आहे. अशातच नेते मंडळी ट्विटर वर बोलतात यामुळे वृक्ष तोड थांबते का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आदित्य ठाकरेसह इतर पक्षाच्या नेत्यांवर टीका केली आहे.