पुणे : पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे राज्यभरातून असंख्य विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागातर्फे वसतिगृह ( Social Welfare Department Hostels ) आणि स्वाधार योजना राबवली जाते. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत (Covid Spread In Maharashtra ) आहे. यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु ग्रामीण भागातून शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढले जात ( Students Foreced To Leave Hostel ) आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दाद मागण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या आयुक्तांकडे आपले निवेदन सादर ( Student Protest In Pune ) केले.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या
निवेदनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाहीत. तसेच निर्वाह भत्ता देखील वेळेत मिळत नाही. स्वाधार योजनेचा कोणताही लाभ त्या विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृह खाली करायला लावत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी यावेळी समाजकल्याण विभाग आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.