पुणे अन्न व औषध प्रशासन, पुणे कार्यालयातर्फे Food and Drug Administration Pune आरोग्यास अपायकारक पफ वनस्पती विक्रेत्यांवर कारवाई action against puff stock seller करुन १० लाख ५८ हजार ३८० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड Pune Market yard येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक छापे Puff Plant Stock Seized Pune टाकून घाऊक विक्रेत्यांकडून विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या वनस्पती हा अन्न पदार्थ आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल प्राप्त होताच घाऊक विक्रेते व वितरकांकडील उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे. Pune food and drug administration
घाऊक विक्रेत्याकडे तपासणी आणि कारवाई पफ वनस्पती ग्रेड शेफ ब्रँड या अन्न पदार्थाचे घाऊक विक्रेत्याकडे तपासणी करुन नमुना घेऊन उर्वरित ३ लाख ५२९ रुपये किंमतीचा १ हजार २८८ किलो साठा तसेच वनस्पती पफ सेंच्युरी ब्रँडचा ४ लाख ३७ हजार ९६६ रुपये किंमतीचा २ हजार ५३ किलो साठा जप्त करण्यात आला. असा एकूण ७ लाख ३८ हजार ४९५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या वनस्पतीच्या वितरकाकडे तपासणी केल्यानंतर पफ वनस्पती ग्रेड शेफ ब्रँडचा नमुना घेवुन उर्वरित ६६ हजार ९७६ रुपये किंमतीचा ४७८ किलो साठा तसेच पफ सेंच्युरी ब्रँडचा २ लाख ५२ हजार ९०९ रुपये किंमतीचा १ हजार ८७३ किलो साठा असा ३ लाख १९ हजार ८८५ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सण-उत्सव निमित्ताने भेसळखोरांवर करडी नजर येणारे सण-उत्सवाचे दिवस लक्षात घेता प्रशासनातर्फे खाद्यतेल, वनस्पती, तूप, मिठाई, खवा, बेसन आदी अन्न पदार्थाच्या विक्रेत्यांवर लक्ष ठेऊन अयोग्य खाद्यपदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी यावेळी सांगितले.