पुणे - कोरोनाचे निदान झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने काढला आहे. त्यासाठी पुणे महापालिका माहिती गोळा करत असून आतापर्यंत कोरोनाने ९ हजार १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत साडेचार हजार जणांच्या कुटुंबीयांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत.
आयसीएमआर 'पोर्टल' द्वारे करता येणार अर्ज -
कोरोनाने मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने काढला आहे. त्यानुसार महापालिकेकडून यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत कोरोनाने ९ हजार १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत साडेचार हजार जणांच्या कुटुंबीयांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जांना जोडण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. हे अर्ज स्वीकारण्यासाठी आयसीएमआर 'पोर्टल' सुरु करण्यात आले आहे. त्यावर हे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योग्य कागदपत्रे जोडलेल्या अर्जांना मंजुरी -
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानासाठी महापालिकेकडे आतापर्यंत साडेचार हजार अर्ज आले आहेत. त्या अर्जांची पालिकेकडून छाननी सुरू झाली आहे, सर्व योग्य कागदपत्रे जोडलेल्या अर्जांना मंजुरी दिली जाईल आणि ५० हजारांची मदत देण्यासाठी ते पुढे पाठवले जातील, अशी माहिती महापालिकेतील आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.
तरच मिळणार अनुदान -
'कोरोना पॉझिटिव्हचे निदान झाल्यावर तीस दिवसांच्या आत जर मृत्यू झाला असेल, तरच हा निधी संबंधित कुटुंबीयांना मिळणार आहे. तसेच, कोरोनाने मृत्यू झाल्याचे मृत्यू प्रमाणपत्रात स्पष्ट नमूद केलेले असले पाहिजे, यासह अन्य काही अटी यासाठी आहेत. सध्या या अर्जाला जोडलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली जात आहे, अशी माहिती डॉ. भारती यांनी दिली.
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजारांचे अनुदान.. पुण्यातून साडे चार हजार अर्ज - कोरोना मृत्यू संख्या महाराष्ट्र
कोरोनामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तींच्या कुटूंबीयांना 50 हजारांची आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी राज्यभरात माहिती गोळा केली जात आहे. पुणे महापालिकेने सांगितले की, शहरात कोरोनामुळे 9 हजार 107 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी साडेचार हजार जणांच्या कुटूंबीयांना अनुदानासाठी अर्ज केला आहे.