पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी जून 2020 ला जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीला ब्लॅकलिस्ट ( GA Software Technology Company ) केले होते. टीईटीच्या परीक्षा ( TET Exams ) या जानेवारीत झाल्या होत्या. परंतु त्यानंतर झालेल्या विविध परीक्षांमध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यानंतर त्या जीए टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात आले. टीईटी परीक्षेत ( TET Exams ) ज्या अपात्र विद्यार्थ्यांना पात्र केले असेल तर त्याची चौकशी परीक्षा परिषद ( Ineligible Students Inquiry ) करणार आहे. पोलीस तपासाला परीक्षा परिषद पूर्ण सहकार्य करेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप ( Maharashtra State Examination Council President Dattatray Jagtap ) यांनी म्हटले आहे.
- शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक
टीईटी पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. पेपर फुटीला मदत केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पेपर फुटीच्या प्रकरणात स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे तपास पथकास मार्गदर्शन करत आहेत.
- अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग
प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याचे यादीवरून लक्षात आले होते. तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा - Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक