ETV Bharat / city

Special Tukaram Pagdi For PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी तुकाराम पगडी आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. आणि मुरुडकर यांच्याकडून विशेष अशी तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे. ( Special Tukaram Pagdi For PM )

Special Tukaram Pagdi For PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी
author img

By

Published : Jun 10, 2022, 4:21 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी देहू येथील जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार ( Sant Tukaram Maharaj ) पडणार आहे. या दौऱ्याची प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर ट्रस्ट तर्फे विशेष डिझाइनची पगडी घालण्यात येणार आहे. याकरिता पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले ( Murudkar Zendewale in pune ) यांना देहू संस्थांन विश्वस्तांनी तुकाराम पगडी आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. आणि मुरुडकर यांच्याकडून विशेष अशी तुकाराम पगडी तयार करण्यात आली आहे.

स्पेशल डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणे - देहू संस्थांचे नितिन महाराज काळोखे आणि आचार्य भोसले यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास तुकाराम पगडी आणि उपरणे बनविण्याच त्यांनी सांगितले. त्यानुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी एक रेगूलर तुकाराम महाराज पगडी आणि एक डिझायनर तुकाराम पगडी आणि उपरणे बनवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी

पगडी भपकेबाज नसून पारंपरिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जी डिझायनर तुकाराम पगडी बनविण्यात आली आहे. ही भपकेबाज नसून पारंपरिक राहणार आहे. या मागचा आमचा उद्देशही तसाच आहे. देशाच्या पंतप्रधानांना आज तुकाराम महाराजांच्या विचारांची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही ज्या पद्धतीने तुकाराम महाराज जशी पगडी घालायचे तशी पगडी आम्ही बनवत आहोत. या साठी त्या काळी जे कापड ही पगडी बनविण्यासाठी वापरले जात होते, त्याच पद्धतीचे कापड आम्ही वापरला आहोत. ही पगडी वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती घातल्यावर गंध आणि तीला वेगळी लावण्याची गरज पडणार नाही, असे यावेळी मुरूडकर यांनी सांगितले.

Special Tukaram Pagdi For PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अशी असेल पगडी आणि उपरणे - ही पगडी अगदी साध्या पद्धतीने बनविली जाणार आहे. त्या काळी जे कापड पगडीसाठी लागायचे त्याच पद्धतीच्या कापडाने हे पगडी आणि उपरणे बनविले जात आहे.पगडीवर तुळशीच्या माळांची सजावट असणार आहे. या पगडीची केस आणि स्टँडही वैशिष्ट पूर्ण बनविण्यात आला आहे. पगडीचा स्टॅडच्या दोन्ही बाजूला लोड आहे. या सोबतच वर चीपळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याला टाळांची सजावटही करण्यात आली आहे. या साठी डिझायनर उपरणे तयार करण्यात येत आहे. ऑफ व्हाईट रंगाची ही पगडी राहणार आहे. याच कापडाचे उपरणेही बनविले जाणार आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंग लिहिले जाणार आहे. जगतगुरू तुकाराम आणि मोदी यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. यामुळे जेव्हा पंतप्रधान मोदींचा सत्कार ही पगडी घालून होईल. तेव्हा त्यांचे विचार आणि त्यांच आशीर्वाद या माध्यमातून मिळेल, अशा पद्धतीने सुचक पद्धतीन हे अभंग लिहिण्यात आले आहे. असे देखील यावेळी मुरुडकर यांनी सांगितले.

हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटात बादलीभर पाण्यासाठी त्राहीत्राही, 1500 गावकरी 2 टँँकर पाण्यावर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.