ETV Bharat / city

Special Shahi Pheta For PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला बनवला 'राजबिंडा शाही फेटा' - Rajbinda Shahi Feta

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला ( PM Narendra Modi in Pune on 6 March ) पुणे दौऱ्यावर ( PM Narendra Modi On Pune Tour ) येत असून शहरातील मेट्रो तसेच इतर विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच पुण्यातील एमआयटी कॉलेज येथील मैदानावर जाहीर सभा ( PM Modi Public Meeting in MIT College campus ) घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असताना त्यांच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेनुसार मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून शाही फेटा ( Special Shahi Pheta For PM Narendra Modi ) बनविण्यात येत आहे. या शाही फेट्यासाठी एक आठवडाभर मेहनत घेण्यात आली असल्याची माहिती मुरुडकर फेटेवालेचे मालक गिरीश मुरुडकर यांनी दिली आहे.

Special Shahi Pheta For PM
राजबिंडा शाही फेटा
author img

By

Published : Mar 4, 2022, 4:08 PM IST

Updated : Mar 4, 2022, 4:19 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर ( PM Narendra Modi On Pune Tour ) येत असून शहरातील मेट्रो तसेच इतर विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच पुण्यातील एमआयटी कॉलेज येथील मैदानावर जाहीर सभा ( PM Modi Public Meeting in MIT College campus ) घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असताना त्यांच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेनुसार मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून शाही फेटा ( Special Shahi Pheta For PM Narendra Modi ) बनविण्यात येत आहे. या शाही फेट्यासाठी एक आठवडाभर मेहनत घेण्यात आली असल्याची माहिती मुरुडकर फेटेवालेचे मालक गिरीश मुरुडकर यांनी दिली आहे.

पुण्यात बनवला पंतप्रधानांसाठी राजबिंडा शाही फेटा

मोदींच्या फेट्याची खासियत -

मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनेक फेटे तयार करण्यात आले आहे. आजवर झालेला नाही असा ऐतिहासिक फेटा तयार करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही त्यावर काम सुरू केले. सुमारे आठ दिवस 5 ते 6 लोकांची टीम मिळून हा फेटा तयार केला आहे. हा राजबिंडा शाही फेटा असून यात शिवमुद्रा, रेशमीचा कापड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसकोडला शोभेल असा फेटा बनविला आहे. तसेच यावर मोत्यांचा सूर्यफूल देखील बनविण्यात आला आहे. असे देखील यावेळी मुरुडकर यांनी सांगितले.

Special Shahi Pheta For PM
'राजबिंडा शाही फेटा'

स्वागताची जय्यत तयारी -

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपकडून मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुभेच्छांचे बॅनरही लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, ओव्हर हेड केबल काढण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा दिवस रात्र कामाला लागली आहे.

हेही वाचा - Bhagat Singh Koshyari Solapur Visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना सोलापुरात कडाडून विरोध; काळे झेंडे दाखवले

Last Updated : Mar 4, 2022, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.