ETV Bharat / city

आंबील ओढा प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवारांविरोधात घोषणाबाजी, आंदोलक संतप्त - ambil odha issue pune

आंबील ओढा येथे झालेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी पुणे महापालिकेच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला भेट दिली. मात्र, संतप्त आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

आंबील ओढा
आंबील ओढा
author img

By

Published : Jun 29, 2021, 7:27 AM IST

पुणे - आंबील ओढा येथे झालेल्या कारवाईच्या विरोधात सोमवारी पुणे महापालिकेच्या बाहेर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. याच वेळी दुसऱ्या बाजूला स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंबील ओढा प्रकरणी सुरू असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनालाही भेट दिली. त्यांच्या भेटीनंतर आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

मला पुरावे द्या, मी स्वतः तक्रार करते - सुप्रिया सुळे

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. जे आज घोषणाबाजी करत आहे त्यांनी मला पुरावे, द्या मी स्वतः हा माझ्या नावाने तक्रार दाखल करते. कोणीही काहीही बोलेल त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला माहिती आहे, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. आंबील ओढा येथील बाधितांशी चर्चा करून त्यांचे प्रतिनिधी आणि मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन आणि मार्ग काढेन, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली.

आंबील ओढा प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या समोरच अजित पवारांविरोधात घोषणाबाजी...

आंदोलनाला शुभेच्छा..

आमचे महाविकास आघाडीच सरकार हे दडपशाहीच सरकार नाहीये. आंदोलन करण्याचा अधिकार डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. म्हणून माझ्या प्रत्येक आंदोलनाला शुभेच्छा आहेत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताई आम्हाला न्याय द्या..

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. ज्या बिल्डरच्यावतीने ही कारवाई करण्यात आली तो बिल्डर अजित पवार यांच्या जवळचा असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला. दलितांची मते चालतात मात्र आमचे प्रश्न सोडविले जात नाही, असे म्हणत सुप्रियाताई यांनी आम्हाला न्याय द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.