पुणे - शिवजयंतीच्या निमित्ताने एका चिमुकलीने छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे. ध्रुवी पडवळ या अवघ्या सहा वर्षांच्या मुलीने सिंहगडाचा अतिशय अवघड तान्हाजी कडा सर केला केलाय.
सिंहगडाच्या उत्तुंग शिखराकडे पाहून डोळे भिरभिरतात; परंतु या चिमुकलीचे हे साहस पाहून मोठ्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्व आव्हानांवर मात करत चिमुकलीने सिंहगडाचा तानाजी कडा सर केलायं.
सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी नरवीर तान्हाजींच्या बलिदानानंतर हा गड स्वराज्यात आला होता. सिंहगड घेण्यासाठी तान्हाजी आणि अन्य मावळ्यांनी या कड्यावरून चढाई केली होती. तान्हाजी सिनेमा पाहिल्यानंतर तिने या कड्यावर चढाईचा हट्ट धरला. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एस. एल. अॅडव्हेंचर स्पोर्ट्स आणि मावळा जवान संघटनेच्या पाठिंब्यावर तिने ही चढाई यशस्वीपणे पूर्ण केली.