पुणे - गेल्या 9 वर्षांपासून बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेले अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ आज मंगळवार दि. 30 ऑगस्ट रोजी पुण्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीने आणि श्री योग वेदांत सेवा समिती (पुणे) साधक मंडळीतर्फे March in support of Asarambapu शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत तब्बल 5 हजार हून अधिक भक्तांच्या उपस्थितीत मुक मोर्चा काढण्यात आला.
जिल्ह्यातून आलेले सुमारे ५ हजार भक्त - संत श्री आसाराम बापू यांच्या अटकेला ३० ऑगस्टला ९ वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्ट मधून तातडीने न्याय मिळावा या मागणीसाठी श्री योग वेदांत सेवा समिती ( पुणे ) साधक मंडळीतर्फे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. Mukmorcha of Asarambapu devotees in Pune पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातून आलेले सुमारे ५ हजार भक्त या मूक मोर्चात सहभागी झाले होते.
सर्वांनी सफेद कपडे परिधान - हातावर काळया फिती बांधून शनीवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर सकाळी साडेअकरा वाजता मूक मोर्चा ला प्रारंभ झाला. साधकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्वांनी सफेद कपडे परिधान करून दंडाला काळया फिती लावल्या होत्या आणि हातात भगवे ध्वज घेतले होते.
राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात - 'बापूजी को रिहा करो', 'संत न होते तो जल मरता संसार', 'नही सहेंगे अत्याचार, झूठे आरोपोंका हो बहिष्कार' अशा अनेक प्रकारच्या घोषणांचे फलक साधकांनी हाती घेतले होते. न्यायालयीन प्रक्रिया संथ गतीने चालत असून न्याय मिळण्यात विलंब होत आहे, याची शासन, समाज आणि न्यायालयाने दखल घ्यावी, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे.शनीवारवाडा, लाल महाल,फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालून राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
हेही वाचा - Maharashtra Crime NCRB Report 2021 महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आढावा; मुंबई अव्वल स्थानी