ETV Bharat / city

ना ढोलताशांचा गजर, ना भक्तांचा गराडा; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला साधेपणाने निरोप - श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन बातमी

दरवर्षी भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक रात्रीची असते. पण, यंदा कोरोनामुळे साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने भवनाबाहेरच भंडारा उधळून गणेश विसर्जन साध्या पद्धतीने केले, अशी माहिती मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला साधेपणाने निरोप
author img

By

Published : Sep 1, 2020, 7:07 PM IST

पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण, यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि शांततेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला गणेशभक्तांनी दुपारी निरोप दिला. कोरोनामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन यंदा साधेपणाने करण्यात आले आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला साधेपणाने निरोप

ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी मोठ्या उत्साहात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक निघत असते. पण, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील प्रमुख मंडळांनी घेतला होता. बाप्पाचे विसर्जन ही साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय या मंडळांनी घेतला आहे . त्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनाबाहेर बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्येच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

दरवर्षी भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक रात्रीची असते. पण, यंदा कोरोनामुळे साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने भवनाबाहेरच भंडारा उधळून गणेश विसर्जन साध्या पद्धतीने केले, अशी माहिती मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली. तरुणाईचा जल्लोष, कार्यकर्त्यांचा उत्साह, ढोल ताशांचा निनाद, भक्तीचा महासागर, रात्रभर जागरण, गणपती बाप्पा मोरयाच्या गगनभेदी घोषणा आणि डोळे दिपवणारा विसर्जन मिरवणूक सोहळा हा सर्व उत्साह यावर्षी कोरोनामुळे पाहायला मिळाला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टमार्फत पहिल्यांदाच ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आली होती. त्याऐवजी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.