पुणे - पुण्यातील गंगाधाम चौकालगत ( Gangadham Chowk Pune ) असलेल्या देवल मोटर्स या छोट्या इलेक्ट्रिक बाईक शोरूमला ( Deval Motors Electric Bike Showroom ) सोमवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास आग लागली. या आगीत सात इ-बाईक ( Seven Electric Bikes Burnt down ) पुर्णपणे जळाल्या आहे.आग का लागली होती याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
गंगाधाम चौकालगत असलेल्या देवल मोटर्स ही एक कोटी ई - बाईकच दुकान असून या ठिकाणी ई बाईक खरेदी विक्री केली जाते.तसेच या ठिकाणी ई बाईक चार्जिंग देखील करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री 8 वाजल्याच्या सुमारास या शॉपला आग ( Electric bike shop on fire ) लागली असून या आगीत 7 ई - बाईक या जळून खाक झाल्या आहेत. यात कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग का लागली आहे. आग का लागली होती याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा : Pune Fire: हडपसर- बिराजदारनगरमध्ये झोपडपट्टीला भीषण आग, 16 झोपड्या जळून खाक