ETV Bharat / city

पुण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, महापौरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट - महापौरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट पुणे

पुण्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्या-त्या जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. पुण्यात रेमडेसिवीरच्या निर्माण झालेल्या तुटवड्याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची भेट घेतली, त्यांच्याकडे रेमडेसिवीरची मागणी केली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : Apr 26, 2021, 9:53 PM IST

पुणे - पुण्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्या-त्या जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. पुण्यात रेमडेसिवीरच्या निर्माण झालेल्या तुटवड्याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची भेट घेतली, त्यांच्याकडे रेमडेसिवीरची मागणी केली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुढे बोलताना महापौर म्हणाले की, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. त्यांना तातडीने ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरची गरज आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. मान्य आहे की राज्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, मात्र पुण्याला जो रेमडेसिवीरचा पुरवठा होणार आहे, तो योग्य पद्धतीने आणि पुरेशा प्रमाणात व्हावा.

रेमडेसिवीर इंजेक्शन कसे खरेदी करायचे?

दरम्यान सध्या पुण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने, इजेक्शनसाठी वनवन भटकण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. आम्ही हवे तेवढे पैसे देऊन रेमडेसिवीर खरेदी करण्यास तयार आहोत. मात्र आम्हाला रेमडेसिवीर कोठून खरेदी करायचे? कसे खरेदी करायचे याची माहिती द्यावी. आम्ही जेथे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी जात आहोत, तेथे आम्हाला थेट इंजेक्शन देण्यास नकार मिळत आहे. थेट इंजेक्शन देण्यासाठी राज्य शासनाची परवानगी नसल्याचे कारण देण्यात येत आहे. पुण्यात सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी दूर करावा अशी मागणी यावेळी महापौरांनी केली.

पुण्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, महापौरांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

निर्बंधांमुळे रुग्ण संख्येत घट

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे पुण्यात गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत आहे. नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. कडक निर्बंधांमुळेच हे शक्य झाल्याचं यावेळी महापौरांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य

दरम्यान यावेळी बोलताना महापौरांनी लसीकरणाबाबत देखील माहिती दिली आहे, 1 मे पासून पुण्यात सरसकट लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र तरी देखील महापालिकेच्या वतीने 1 तारखेनंतर देखील ज्येष्ठ नागरिकांच्याच लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौरांनी यावेळी दिली.

108 केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण

पुणे महापालिकेच्यावतीने शहरात गेल्या 28 दिवसांमध्ये जवळपास 4 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सरकारच्या आदेशानुसार 1 तारखेनंतर खासगी रुग्णालयांना लस पुरवली जाणार नाहीये. त्यामुळे अधिकची लस आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या लसींचा पुरवठा महापालिकेच्या 108 केंद्रांना करण्यात येणार असल्याचेही यावेळी मोहळ म्हणाले.

हेही वाचा - ताडदेव पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.