ETV Bharat / city

शिवाजीराव आढळराव पाटील यांची आमदार महेश लांडगे यांच्याशी 'दिलजमाई' - महेशदादा लांडगे

आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे.त्यामुळेच आढळराव यांनी बँकफूट'वर जात महेश लांडगे यांची 'मनधरणी' केली आहे. आता महेशदादा लांडगे हे त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेणार आहेत.

Breaking News
author img

By

Published : Mar 29, 2019, 6:53 PM IST

पुणे - शिरूर लोकसभेतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात मतभेद होते. त्यांच्यातील वैर सर्वश्रृत होते. मात्र, आज (२९ मार्च) शिवसेना खासदार शिवाजी पाटील यांनी लांडगे यांच्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली.

शिवाजीराव पाटील आणि महेशदादा लांडगे यांच्यातील गेल्या पाच वर्षांपासून कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. महेश लांडगे यांच्या प्रत्येक कामात पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. यामध्ये मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो, की 'वेस्ट टू एनर्जी'चा प्रकल्प, महेश लांडगे यांच्यावर पाटील निशाणा साधत होते. म्हणूनच आमदार लांडगे यांनी शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे शिवाजीरावांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मात्र, आता शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे.त्यामुळेच आढळराव यांनी बँकफूट'वर जात महेश लांडगे यांची 'मनधरणी' केली आहे. आता महेशदादा लांडगे हे त्यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेणार आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील यांची आमदार महेश लांडगे यांच्याशी 'दिलजमाई'

झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू. प्रचारात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आढळराव पाटलांनी केले आहे. तर, आमदार महेश लांडगे म्हणाले की, 'देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. युतीचा 'धर्म' आम्ही पाळणार आहोत. निवडणुकीत युतीचाच प्रचार आम्ही करणार आहोत. भोसरी मतदारसंघातून आढळरावांना प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:Anc__शिरूर लोकसभेचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ‘टेंन्शन’ अखेर दूर झाले आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांची ‘मनधरणी’ करण्यात आढळरावांना अखेर यश आलं शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि भाजप संलग्न आमदार महेश लांडगे यांचे वैर सर्वश्रुत होते त्यात आज खासदार शिवाजी आढळराव पाटील भोसरीतील आमदार लांडगेंच्या कार्यालयास भेट देऊन चर्चा केली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये ‘दिलजमाई’ झालीय

Byte__शिवाजी आढळराव,खासदार शिरूर

Vo__आढळरावांच्या प्रचारात आता आमदार लांडगे सक्रीय सहभाग घेणार आहेत शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यात कमालीचा संघर्ष गेल्या पाच वर्षात पहायला मिळाला. महेश लांडगे यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आढळराव आणि त्यांच्या समर्थकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. मोशी कचरा डेपोचा प्रश्न असो की वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प खासदारांनी प्रत्येकवेळेस महेश लांडगेंवर निशाना साधला होता. म्हणूनच आमदार लांडगे यांनी थेट दंड थोपटत शिरूरच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे आढळरावांचे ‘धाबे’ चांगलेच दणाणले होते. परंतू आता शिवसेना, भाजप युती झाल्यामुळे कट्टर विरोधकांना एकत्र यावे लागले आहे. कारण लांडगे प्रचारात सक्रीय होत नसल्यामुळे आढळरावांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हणूनच त्यांनी ‘बँकफूट’वर जात महेश लांडगे यांची ‘मनधरणी’ केली आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या प्रमुख समर्थकांसह आज भोसरीतील आमदार लांडगे यांच्या कार्यालयात युतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.

Byte__महेश लांडगे,आमदार, भोसरी

Vo__ झालं गेलं विसरून जावा.. आता एकत्र काम करू.. प्रचारात भाजपच्या सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आढळराव पाटलांनी केलं तर आमदार महेश लांडगे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. युतीचा ‘धर्म’ आम्ही पाळणार आहोत. निवडणुकीत युतीचाच प्रचार आम्ही करणार आहोत. भोसरी मतदारसंघातून आढळरावांना प्रचंड मतांची आघाडी घेऊन देऊ.

End vo__आज लोकसभेसाठी आढळरावांसाठी युतीचा ‘धर्म’ पाळला जातोय मात्र येणाऱ्या विधानसभेत आढळरावपाटील हा युतीचा" धर्म"पाळणार का असा एक प्रश्न आहेच.Body:स्पेशल पँकेज स्टोरी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.