ETV Bharat / city

Chitra Wagh Notice : चित्रा वाघांच्या अडचणीत वाढ; रघुनाथ कुचिकांनी पाठवली 10 कोटींची नोटीस - रघुनाथ कुचिक मराठी बातमी

भाजपा नेत्या चित्रा वाघ ( Bjp Leader Chitra Wagh ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी दहा कोटींच्या मानहानीचा दावा चित्रा वाघ यांच्यावर दाखल केला ( Raghunath Kuchik Send Notice Chitra Wagh ) आहे.

Chitra Wagh
Chitra Wagh
author img

By

Published : Apr 14, 2022, 4:26 PM IST

Updated : Apr 14, 2022, 4:54 PM IST

पुणे - भाजपा नेत्या चित्रा वाघ ( Bjp Leader Chitra Wagh ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी दहा कोटींच्या मानहानीचा दावा चित्रा वाघ यांच्यावर दाखल करत, नोटीस पाठवली ( Raghunath Kuchik Send Notice Chitra Wagh ) आहे. वकील हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

चित्रा वाघांनी केले कुचिकांवर आरोप - मुलीने केलेल्या आरोपांनंतर मीडिया ट्रायल घेताना वाघ यांनी कुचिक यांच्यावर नराधम, बलात्कारी, थेरडा, असा एकेरी उल्लेख करत त्यांची समाजमनात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच वाघ यांच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आले असल्याचे वकील निंबाळकर यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण? - काही दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचीक यांनी एका २४ वर्षाच्या तरुणीसोबत तिला लग्नाचे आमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. त्यातच ही तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर आरोपीने बळजबरीने तरुणीचा गर्भपात केला. तसेच, या साऱ्या प्रकाराबद्दल जर कोणाला काही सांगितले तर जिवे मारीन, अशी धमकी देखील दिली आहे. फिर्याद या तरुणीने केली होती. शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ कुचीक यांच्याविरोधात कलम ३७६, ३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली - रघुनाथ कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे एका 22 वर्षीय तरुणीने बलात्काराची तक्रार केली होती. यानंतर राजकारण चांगलच तापले होत. माझ्यात आणि कुचिक यांच्यात जे झालं झालं आहे ते खरं आहे. पण, मला तक्रार द्यायची नव्हती. जेव्हा माझ्या एका अंकलच्या सहाय्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याशी संबंध आला. तेव्हा चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी पीडित तरुणीने केला होता.

हेही वाचा - Ambedkar Jayanti 2022 : सोलापुरात आंबेडकर जयंतीनिमित्त फक्त 1 रुपयात 1 लीटर पेट्रोल

Last Updated : Apr 14, 2022, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.