पुणे - शिवसेना नेते आणि नाराज आमदार तानाजी सावंत यांनी परवा सोलापूरच्या सभेत बोलताना आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत होती. महाविकास आघाडीत आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक गदारोळ माजताना पाहायला मिळाले. आणि आता याच प्रकरणावरून शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी शिवसैनिकांचे कान टोचलेले पाहायला मिळत आहेत.
टक्केवारीची भाषा शिवसेनेची नाही - तानाजी सावंत यांनी अतिशोयक्ती केली असे सांगतच नीलम गोऱ्हे यांनी स्थानिक पातळीवर मतभेद असतो. मात्र सर्वांनी संयम बाळगायला हवा असं मत देखील त्यांनी मांडलं आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सामंजसपणा दाखवायला हवा. अर्थाचा अनर्थ कोणीही करू नये आणि टक्के वारीची भाषा शिवसेनेची नाही, असे ठणकावतचं निधी हा राज्य सरकार देत असत. असे सांगत राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात निधीवरून जो वादंग सुरू आहे. त्यावर देखील भाष्य केले आहे.
स्थानिक लोक भूमिका ठरवतील - नाणार प्रकल्पात स्थानिक लोक भूमिका ठरवतील असे सांगतच आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की प्रकल्प कुणावर लादणार नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी देखील स्पष्ट केले आहे की आमचा विकासाला विरोध नाही.असे सांगतच नीलम गोऱ्हे यांनी कोकण आणि महाराष्ट्र प्रदूषित करणारा प्रवाह तिथून वाहत आहे. परंतु शिवसेना आणि कोकणाचं नातं खूप चांगलं आहे, असं स्पष्टीकरण देखील दिलं आहे.
रघुनाथ कुचीक प्रकरणावर भाष्य करणार नाही - पुण्यात झालेल्या रघुनाथ कुचीक प्रकरणी मीच त्या मुलीला विचारलं होत की तुला काय करायच आहे. तर तिने मला सांगितले की मला गुन्हा नोंदवायचा आहे. त्यानंतर मी तिला गुन्हा नोंदवायला सांगितल. पण मी आता पोलीस तपासामध्ये बोलून हस्तक्षेप होईल म्हणून यावर भाष्य करणार नसल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील असे देखील सांगितलं आहे.