ETV Bharat / city

Shivsena on Chandrakat Patil : ...हिमालयात कधी जाताय ?, शिवसेनेची बॅनरबाजी

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची मते ४१ हजारांवरुन वाढून ७८ हजार झाली आहेत. जनाधार वाढवण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे मतही चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केले आहे.

बॅनर
बॅनर
author img

By

Published : Apr 16, 2022, 7:09 PM IST

पुणे - उत्तर कोल्हापूरच्या निवडणूक प्रचारावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) म्हणाले होते, भाजपचा उमेदवार निवडून आला नाही तर मी हिमालयात जाईन. त्यानंतर झालेल्या निवडणुकीचा निकाल ( Election Results ) आज लागला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. यामुळे या विधानावरुन शिवसेनेने बॅनरबाजी करत चंद्रकांत पाटील यांनी डिवचले आहे.

दादा हिमालयात कधी जाताय..? - शिवसेनच्या वतीने पुण्यातील कोथरुडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालया समोरच 'चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय..?', असा प्रश्न उपस्थित करणारा भलामोठा बॅनर लावण्यात आला ( Shivsena on Chandrakat Patil ) आहे. त्यावरुन आता भाजपचे नेते व कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी नेत्यांकडून तिकीट बूक - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आता हिमालयात जावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज राजापूरकर यांनी तिकीट बूक केले आहे. राष्ट्रवादीकडून हे तिकीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

देहरादून एक्सप्रेसने हरिद्वारपर्यंतचे तिकीट बुक - चंद्रकात पाटील यांच्यासाठी 20 एप्रिलच्या देहरादून एक्सप्रेसने हरिद्वारपर्यंतचे थ्री टियर एसीचे तिकीट बुक करण्यात आले आहे. या प्रवासात त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली असल्याचे राज राजापूरकर यांनी सांगितले आहे. तसेच हरिद्वारपासून हिमालयापर्यंत जाण्यासाठी घोडा किंवा खच्चरचा वापर चंद्रकांत पाटील यांनी करावा, असा सल्लाही राजापूरकर यांच्याकडून दिला आहे. त्यामुळे राज्यभरात या विषयाची चर्चा सध्या सुरू आहे.

भाजपची मते वाढली - चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची मते 41 हजारांवरून वाढून 78 हजार झाली आहेत. जनाधार वाढवण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Ajit Pawar On Election : कोल्हापूर निवडणुकीत शिवसेनेने मनापासून काम केले अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.