पुणे - एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केलं. त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावं लागलं. त्यानंतर शिंदे गटात खासदारांसह शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. पुण्याच्या एका शिवसैनिकानेही शिंटे गटात प्रवेश केला ( shivsainik raju vitakar joined shinde group ) होता. मात्र, एकाच दिवसांत निर्णय बदलत शिवसेनेत परत येण्याचा निर्णय त्या शिवसैनिकाने ( raju vitkar joined shivsena uddhav thackeray group ) घेतला. राजू उर्फ तम्मा विटकर असे त्या शिवसैनिकाचे नाव आहे.
राजू विटकर हे पुण्यातले तीन वेळा विभाग प्रमुख राहिले आहे. याबाबत विटकर यांनी सांगितलं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे, तर आपण जायला पाहिजे. हा एकच हेतू ठेवून मी तिकडे गेलो. माझ्या एक मित्र सोबत मी मुंबईला गेलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला कोणतेही आमिष दिलं नव्हतं अथवा ऑफर दिली नाही.
'मला सहन झालं नाही...' - मला त्यानंतर घरी आल्यानंतर रात्रभर झोप लागली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत टीव्हीवर पाहल होतो. हे सगळ पाहत असताना मला वाटल की आपण शिवसेनेत गेलं पाहिजे. मला सहन झाल नाही. मात्र, आता मूळ शिवसेनेत आहे. मुख्यमंती शिवसेनेचे आहेत. पण, जे गेले ते परत येतील. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांना सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही. मात्र, दोन्ही नेते एकत्र येतील, शिवसेना एकत्र पाहिजे, असे स्पष्टीकरणही राजू विटकर यांनी दिलं.
हेही वाचा - 50 बंडखोर आमदारांना मनसेत प्रवेश देणार का? राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका