ETV Bharat / city

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील आढळराव-पाटलांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा; मुख्यमंत्र्यांना बॅनरवर टाळलं - शिवाजीराव आढळराव पाटलांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

एकनाथ शिंदे गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ( Shivajirao Adhalarao Patil Wishesh Uddhav Thackeray On His Birthday ) आहेत.

Shivajirao Adhalarao Patil
Shivajirao Adhalarao Patil
author img

By

Published : Jul 27, 2022, 4:28 PM IST

पुणे - एकनाथ शिंदे गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या बॅनरवरती दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचाच फोटो आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांचा फोटो या बॅनरवरती लावण्यास आढळराव-पाटलांनी टाळलं ( Shivajirao Adhalarao Patil Wishesh Uddhav Thackeray On His Birthday ) आहे.

आढळराव-पाटील शिंदे गटात - एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सोशल मीडियावरुनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो टाकणं टाळलं होतं. त्यानंतर या शुभेच्छांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आढळराव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मग काही तासांतच यू टर्न घेत, आढळराव पक्षातच असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, या कारवाईमुळे नाराज झालेले आढळराव काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. ज्यांना नेतृत्व मानलं आहे, त्या एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकणं यावेळी टाळलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत. कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शन असणार आहे.

हेही वाचा - Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.