ETV Bharat / city

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काही भाग फुटले; पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते उद्घाटन - पंतप्रधान मोदी शिवाजी पुतळा उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ( Pune NCP president Prashant Jagtap ) , प्रदीप देशमुख आणि काँग्रेसचे अविनाश बागवे ( Congress leader Avinash Bagve ) यांनी या घटनेबद्दल भाजप सरकारचा तीव्र निषेध केला आहे. या गोष्टीबद्दल कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीमध्ये बसविण्यात आला. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही जगताप ( Shivaji maharaj statues quality ) यांनी केला.

छत्रपती शिवाजी पुतळ्याची मेघडंबरी
छत्रपती शिवाजी पुतळ्याची मेघडंबरी
author img

By

Published : Mar 7, 2022, 5:42 PM IST

Updated : Mar 7, 2022, 6:20 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रविवारी ( PM Modi Pune Visit ) अनावरण करण्यात आले होते. सोमवारी दुपारी या पुतळ्याच्या मेघडंबरीचा काही भाग कोसळून पडला. ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने निदर्शनास आणून या घटनेचा ( NCP Congress protest in PMC ) निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ( Pune NCP president Prashant Jagtap ) , प्रदीप देशमुख आणि काँग्रेसचे अविनाश बागवे ( Congress leader Avinash Bagve ) यांनी या घटनेबद्दल भाजप सरकारचा तीव्र निषेध केला आहे. या गोष्टीबद्दल कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी प्रशांत जगताप यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीमध्ये बसविण्यात आला. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोपही जगताप ( Shivaji maharaj statues quality ) यांनी केला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काही भाग फुटले

हेही वाचा-PM inaugurates Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन, हिरवा झेंडा दाखवत मोदींचा मेट्रोतून प्रवास

भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटनदेखील केले. या कार्यक्रमाला काही तास होत नाही, तोवर क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेताना मेघडांबरीचा काहीसा भाग पडला आहे. यावरून शिवप्रेमीनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा-विद्यार्थ्यांनो संधीचा उपयोग करा, स्थानिक समस्या, देशाच्या समस्या सोडवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

1850 किलो पुतळ्याचे वजन -

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ( PM Modi Unveiling Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे तसेच महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते. महापालिकेतील हा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून त्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.

वंचित बहुजन आघाडीने महापौरांच्या दालनात फेकली शाई
वंचित बहुजनआघाडीचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. महापालिकेत जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात शाईफेक केली आहे. त्यानंतर ते सारे कार्यकर्ते घोषणाबाजी करत ज्या ठिकाणी शिवरायांचा पुतळा बसवला आहे तिथे आंदोलन करत हा सगळा प्रकार चुकीचा असून यात केवळ महापौर आणि आयुक्तांची चूक आहे असा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे मेट्रो उद्घाटनानंतर दिला 'हा' अभिप्राय

Last Updated : Mar 7, 2022, 6:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.