पुणे - सिरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याची माध्यमे माझ्याबाबत काहीही पसरवतात. पण, कोरोनाची लस नाही तर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी इंजेक्शन घेऊन आलो आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या भेटीचे कारण सांगितले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, की प्रतिकारशक्ती वाढविण्याचे मी इंजेक्शन घेतले आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील इंजेक्शन घेतले. लसीची प्रगती कुठपर्यंत पोहोचली आहे, हे समजून घेण्यासाठी सिरमला गेलो होतो. जानेवारी अखेरपर्यंत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लस बाजारात येईल, असे सिरमकडून सांगण्यात आल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-'हाथरसमध्ये लपवण्यासारखे काहीच नाही, तर मग विरोधीपक्षांना का रोखलं'
पवार म्हणाले, की सगळ्याला तोंड देण्याची प्रतिकारक्षमता व्हावी, यासाठी क्षमता तयार करणारी लस घेतली आहे. पण, खासगीत लोक म्हणतात, मला काही होणार नाही. कारण, पुनावाला हे माझे वर्गमित्र आहेत. त्यांच्याकडून कोरोनाची लस घेतल्याची चर्चा आहे. मी लस घेतल्याने काही होणार नाही. त्यामुळे ते हिंडतात, अशी माझ्याबाबत खासगीत लोक चर्चा करतात. पण हे खरे नाही, असे शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा-हाथरस प्रकरण : राष्ट्रवादीला हवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजनामा
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूकडून कोरोनाची लस करण्यासाठी मानवी चाचणी घेण्यात येत आहे. सिरमने लसीच्या उत्पादनासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर करार केला आहे.