बारामती ( पुणे) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास कामाचे सूत्र होय हे सबंध ( Sharad Pawar praises Ajit Pawar ) महाराष्ट्राला परिचित झाले आहे. त्यांनी बारामतीत विकास कामे करत असताना प्रशासकीय भवन, आरटीओ कार्यालय, मेडिकल कॉलेज, न्यायालय, नगरपालिका इमारत आधी शहराच्या वैभवात भर घालणारे विकास कामे केली आहेत. या विकास कामांचे कौतुक करत असताना मला त्रास होत असल्याचे खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन ( Baramati APMC new building ) प्रसंगी बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की बारामतीमधील विकास कामांचे कौतुक करताना ( Development in Baramati by Ajit Pawar ) मला त्रास होतो. कारण, नुकतेच काही वकील मला भेटले. त्यांनी मागणी केली की, आम्हाला न्यायालयासाठी इमारत हवी आहे. तुम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोला. तसेच एका तालुक्यातील काहींनी विद्युत मंडळाची इमारत व विश्रामगृहाची ( gov offices constructions in Baramati ) मागणी केली. सर्वजण बारामतीत जशा इमारती आहेत तशा बांधून द्या, अशी मागणी करत आहेत. शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उपस्थित होते.
हेही वाचा-NIA Arrests IPS : धक्कादायक! आयपीएस अधिकारी निघाला लष्कर ए तोयबाचा हस्तक? गोपनीय माहिती पुरविल्याने एनआयकडून अटक
दुसऱ्या टप्प्यात ४० हजार किलामीटर रस्ते तयार होणार
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महिला समृद्धीसाठी स्वयंसहायता बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. गरजूंना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी महाआवास अभियानांतर्गत ४ महिन्यात ५ लाख घरे बांधण्यात आली आहेत. यावर्षीदेखील ५ लाख घरे बांधण्याचा संकल्प केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ४० हजार किलामीटर रस्ते तयार होणार आहेत. त्यापैकी १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
मोठ्या गावांचा विकास करण्याची योजना आणणार- ( Special scheme for towns in Maharashtra )
आर. आर. पाटील यांच्या स्मृतीदिनी सुंदर गाव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या ग्रामीण गावातील घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंधराव्या वित्त आयोगातील निधी ग्रामपंचायतीसोबत काही प्रमाणात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याने यशस्वीपणे राबविलेली पाणंद रस्ते आणि गोठे बांधण्याची योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेप्रमाणे मोठ्या गावांचा विकास करण्याची योजना आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हेही वाचा- Charged Against Police Officers : तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल