पुणे - राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना 2017 साली व्यसनमुक्तीबाबत शासनाचा महात्मा गांधी यांच्या नावाने मिळालेलं पुरस्कार परत केला आहे.
वाईन आत्ता सर्वसामान्य दुकानात मिळणार आहे. वाईन ही दारू आहे का नाही त्यात काहीही अर्थ नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. वाईन पिणं हे देखील चुकीचं आहे. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून लहान मुलांवर आम्ही शाहिरीच्या माध्यमातून संस्कार करत आलो आहे. आत्ता सरकारचं दुकानांमध्ये वाईन आणत असेल ते निषेधार्थ आहे. शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत नेहेमीच प्रबोधन करत आलो आहे. याबाबत हा राज्यशासनाचा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. पण सरकारच्या या निर्णयामुळे ज्या मुलांवर संस्कार करणार आहोत. तेच मुलं उद्या जाऊन दुकानांमधून वाईन घेतील. हे चुकीचं असल्याने याच्या निषेधार्थ हा पुरस्कार मी शासनाला परत करत असल्याचं मत यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केलं. सरकारने जो निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा असून याबाबत पून्हा विचार करून हा वाईन बाबतचा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी मावळे यांनी केली.
हेही वाचा - Income Tax Red: निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाने हवाला मार्फत आलेले 6 कोटी केले जप्त