पुणे संस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सव Navratri festival 2022 असलेल्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या Satyam Shivam Sundaram Foundation वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे ऑनलाईन बुकिंग देखील घेण्यात येत आहे. या संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल Viral on social media होत आहे.
शिबिरात प्रशिक्षण एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. तरुण- तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर असणार आहे. ज्याची फी 15 हजार रुपये आहे. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक मानले जात आहे. पुणे पोलीस Pune Police आता सत्यम शिवम फाउंडेशनच्या सूत्रधाराला शोधणार का ? असा प्रश्न आता पुणेकर उपस्थित करत आहेत.