ETV Bharat / city

Omicron Variant : राज्याची चिंता वाढली.. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण - कोरोना ओमायक्रॉन विषाणू

महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. (Omicron virus in Maharashtra) शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात (Omicron Variant in pune) एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे

Omicron Variant
Omicron Variant
author img

By

Published : Dec 5, 2021, 7:39 PM IST

Updated : Dec 5, 2021, 9:55 PM IST

पुणे - राज्यातील ओमायक्रॉनचा पाहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर आज पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आणखीन 6 तर पुण्यात एकाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला आहे. (Omicron Variant in pune) यामुळे शहरासह राज्यात देखील (Omicron virus in Maharashtra) चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.

पिंपरी - चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे 6 रुग्ण -

२४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज (Omicron Variant in pune) संध्याकाळी दिला आहे.

माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ

पुण्यात एका 47 वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण -

तसेच पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. या सहा जणापैकी ३ जण नायजेरियातून आले आहेत तर इतर तिथे त्यांचे निकट सहवासातील आहेत. नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपरी-चिंचवड येथे आली. त्या तिघांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे आता सिद्ध झाले आहे.

सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षांखालील -

या तिघींच्या १३ निकट सहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षांचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षांखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुण्यातील रुग्णाला कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर -

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

जनतेने भीती न बाळगता सतर्क रहावे -

राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

Last Updated : Dec 5, 2021, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.