ETV Bharat / city

Sesame Jaggery Rate Hike : संक्रातीच्या तोंडावरच तीळ-गुळ महाग! किमतीत प्रति किलो 5 ते 10 रुपयांची वाढ - Sesame jaggery rate hike before Makar Sankrati

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका ( corona impact on ordinary people in lockdown ) बसला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीतच मकरसंक्रातीच्या तोंडावर तीळ आणि गूळ यांच्या किमतीत वाढ झाल्याचे ( Sesame jaggery rate hike before Makar Sankrati ) पाहायला मिळाले आहे.

तीळ गुळ विक्री
तीळ गुळ विक्री
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:58 PM IST

Updated : Jan 11, 2022, 4:18 PM IST

पुणे- वातावरणीय बदल आणि इंधन दरवाढीमुळे तीळ व गुळाच्या किमतीत ( rate hike of seaseme ) वाढ झाली आहे. तिळाच्या किमतीत प्रति किलो 5 रुपये तर गुळाच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ ( rate hike of Jaggery ) झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका ( corona impact on ordinary people in lockdown ) बसला होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीतच मकरसंक्रातीच्या तोंडावर तीळ आणि गूळ यांच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला ( Sesame jaggery rate hike before Makar Sankrati ) मिळाले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.

वातावरणीय बदल आणि इंधन दरवाढीमुळे तीळ व गुळाच्या किमतीत वाढ

हेही वाचा-आरोग्यासाठी बहुमूल्य तीळ आणि गुळाचे गोड पदार्थ

चिक्की गुळाच्या दरात किलोमागे 5 ते 10 रुपयांनी वाढ
संक्रातीला तयार करण्यात येणाऱ्या गूळपट्टी, तीळपट्टी, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू तयार करण्यासाठी चिक्की गुळाचा ( various types of Jaggery sale in festival ) वापर केला जातो. साध्या गुळाच्या तुलनेत चिक्की गुळ मिश्रणाला धरून ठेवणारा असतो. गृहिणींकडून चिक्की गुळाला मोठी मागणी असते. मिठाई विक्रेते साखरेचा वापर करत असल्याने गृहिणी संक्रातीला घरीच तिळाचे लाडू व तीळपट्टी तयार करतात.

हेही वाचा-Winter season special : हिवाळ्यात आरोग्यदायी तीळ तसेच उष्ण पदार्थांना वाढती मागणी

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून दौंड, दापोली, सुपणे तसेच सांगली, कराड, पाटण भागातून चिक्की गूळ विक्रीस पाठविला जातो. सध्या पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आठ ते दहा ट्रकमधून गुळ विक्रीस पाठविला जातो, अशी माहिती व्यापारी अजित बोरा आणि निखिल मेहता यांनी दिली आहे.

Last Updated : Jan 11, 2022, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.