ETV Bharat / city

पुणे: महाळुंगे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 3 लाखांची लाच घेतांना अटक - senior police officer

महाळुंगे परिसरात मागील काही दिवसात नवीन चौकी झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्याकडे या चौकीचा पदभार देण्यात आला होता. दरम्यान, या भागातील नागरिकांना आणि उद्योजकांना पैशांसाठी त्रस्त केले जात होते. तसेच अवैध धंदेही बोकाळले होते. या अवैध धंद्यांमध्ये काही पोलिसांचीच भागीदारी असल्याची चर्चा होती.

पोलीस ठाणे
author img

By

Published : Sep 29, 2019, 4:06 AM IST

पुणे - नव्याने चाकण पोलीस ठाण्यापासून विभक्त करण्यात आलेल्या महाळुंगे पोलीस चौकीला काहीच महिने झाले आहेत. मात्र, गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्यासह पोलीस नाईक अजय भापकर आणि त्यांचा खाजगी सहायक (झिरो पोलीस) यांना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

पोलीस ठाण्याची दृष्ये
या कारवाई दरम्यान, लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता, लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस नाईक भापकर यांनी वाहनचालकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून जाणाऱ्या वाहनाला लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्रीहरी पाटील अक्षरशः लटकले. यानंतर काही अंतर फरफटत गेल्याने ते जखमी झाले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस नाईक भापकर आणि पोलिसांचा खासगी सहाय्यक फरार झाले आहेत. तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात निर्दोष सुटण्यासाठी मदत करण्यासाठी १० लाखांची मागणी पोलीस निरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे केली होती. मात्र, त्यात सात लाखांची तडजोड रक्कम ठरली. ठरलेल्या रकमेपैकी तीन लाख रुपये घेऊन पोलीस निरीक्षक जाधव यांनी महाळुंगे येथे तक्रारदाराला शनिवारी बोलावून घेतले होते, यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - ...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात

घटनेतील तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक जाधव यांनी ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलीस नाईक अजय भापकर आणि एका खाजगी सहाय्यकास सांगितले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक जाधव यांच्या आदेशानंतर तक्रारदार आणि पोलीस नाईक भापकर खराबवाडी येथे गेले. त्यांच्या मागावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक होतेच. यानंतर भापकर यांनी लाचेची रक्कम खासगी सहाय्यक असलेल्या पाटील नामक व्यक्तीच्या चारचाकी वाहनात देण्यास सांगितले. दरम्यान, रक्कम या वाहनात देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्या वाहनाकडे धाव घेतली. मात्र, पाटील नामक इसमाने वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यास ताब्यात घेण्यात आले असून, वाहन आणि त्यातील लाचेची ३ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

हेही वाचा - प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांपेक्षा मोठे आहेत का?

महाळुंगे परिसरात मागील काही दिवसात नवीन चौकी झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्याकडे या चौकीचा पदभार देण्यात आला होता. दरम्यान, या भागातील नागरिकांना आणि उद्योजकांना पैशांसाठी त्रस्त केले जात होते. तसेच अवैध धंदेही बोकाळले होते. या अवैध धंद्यांमध्ये काही पोलिसांचीच भागीदारी असल्याची चर्चा होती. गुन्हे शाखेच्या माध्यमातूनही काहींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हजेरी लावल्याची माहिती आहे.

अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्यावरील पुर्वीची कारवाई -

27 जून 2011 ला खालापूरमधील रेव्ह पार्टीसंदर्भात पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. पार्टी आयोजकांना मदत केल्याचा आणि नशेरी पदार्थ पुरवल्याचा जाधवांवर आरोप होता. त्यावेळी ऍन्टी नार्कोटीक्सचे पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा - पाकिस्तानच्या खेळाडूंशी 'पंगा' घेणे माझी आवड, भारतीय फलंदाजाचा खुलासा

Intro:Anc_नव्याने चाकण पोलीस स्टेशनपासुन विभक्त करण्यात आलेल्या महाळुंगे पोलीस चौकीला काहीच महिने झाले असताना गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्यासह एक पोलीस नाईक अजय भापकर आणि त्याचा खाजगी सहायक (झिरो पोलीस) यांना आज सायंकाळी पाचच्या सुमारास तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत विभागाने सापळा रचला असताना लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस नाईक भापकर व वाहनचालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पळून जाणाऱ्या वाहनाला लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्रीहरी पाटील अक्षरशः लटकले. काही अंतर फरपटत गेल्याने ते जखमी झाल्याचा थरार घडला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून एक पोलीस नाईक भापकर आणि पोलिसांचा खाजगी सहाय्यक फरार झाले आहेत तक्रारदारावर दाखल असलेल्या गुन्ह्यात निर्दोष सुटण्यासाठी मदत करण्यासाठी १० लाखांची मागणी पोलीस निरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे केली होती. मात्र, त्यात सात लाखांची तडजोड रक्कम ठरली. ठरलेल्या रकमेपैकी तीन लाख रुपये घेऊन पोलीस निरीक्षक जाधव याने महाळुंगे येथे तक्रारदाराला आज बोलावून घेतले होते त्यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचुन कारवाई केली आहे

दरम्यान, यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलीस निरीक्षक जाधव यांनी ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलीस नाईक अजय भापकर आणि एका खाजगी सहाय्यकास सांगितले. पोलीस निरीक्षक जाधव याच्या आदेशानंतर तक्रारदार आणि पोलीस नाईक भापकर खराबवाडी येथे गेले. त्यांच्या मागावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक होते. भापकर याने लाचेची रक्कम खाजगी सहाय्यक असलेल्या पाटील नामक व्यक्तीच्या स्कॉर्पिओ एम एच १४ सी ए ९४४४ मध्ये देण्यास सांगितली. रक्कम या वाहनात देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सदरच्या वाहनाकडे धाव घेतली. मात्र, पाटील नामक इसमाने वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यास ताब्यात घेण्यात आले असून, वाहन आणि त्यातील लाचेची ३ लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

दरम्यान, महाळुंगे परिसरात मागील काही दिवसात नवीन चौकी झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान येथील नागरिकांना आणि उद्योजकांना पैशांसाठी त्रस्त केले जात होते. अवैध धंदेही बोकाळले होते. त्या अवैध धंद्यांमध्ये काही पोलिसांचीच भागीदारी असल्याची चर्चा होती. गुन्हे शाखेच्या माध्यमातूनही काहींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हजेरी लावली.

अनिल उर्फ भानुदास जाधव यांच्यावरील पुर्वीची कारवाई....

27 जून 2011रोजी खालापूरमधील रेव्ह पार्टीसंदर्भात पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव याला निलंबित करण्यात आलं होतं ,पार्टी आयोजकांना मदत केल्याचा आणि ड्रग्ज पुरवल्याचा जाधववर आरोप होता.त्यावेळी ऍन्टी नार्कोटीक्सचे पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना अटक करण्यात आली होती मुंबईपासून 60 किलोमीटरवर असलेल्या खालापूर गावाजवळच्या माऊंट व्ह्यू या रिसॉर्टवर ही रेव्ह पार्टी सुरू होती त्या पार्टीत आयोजकांना मदत करुन ड्रग्ज पुरविण्यात पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव मदत केली होती त्यावेळी त्याचे निलंबन करुन अटक करण्यात आले होते...Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.