ETV Bharat / city

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022 : पुण्यातील ज्येष्ठ लेखक न.म. जोशींनी दिला डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा - बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे

बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असताना पुण्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर झालेली भेट तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ.न.म.जोशी यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

लेखक न.म. जोशी
लेखक न.म. जोशी
author img

By

Published : Apr 13, 2022, 3:26 PM IST

पुणे - महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुवार (14 एप्रिल) १३१ वी जयंती. देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वप्रथम या महामानवाला अभिवादन. एक थोर समाजसुधारक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ओळखतो. बाबासाहेबांनी प्रत्येक विषयावर सखोल चिंतन व अभ्यास केला. आपल्या विचारांना विविध चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून मूर्त रूप दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देत असताना पुण्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर झालेली भेट तसेच अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ.न.म.जोशी यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

अशी झाली भेट : सन 1951 आली डॉ.न.म.जोशी हे 11 वर्षेचे असताना शाळा शिकून ते पेपर टाकायचे काम करत होते. पुण्यातील नारायण पेठ येथे आचार्य ना.वा.तुंगार हे पालीचे पंडित राहत होते. त्यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू होते. एके दिवशी सकाळीच तुंगार हे काही कागदपत्र घेऊन बाहेर उभे होते. मी जेव्हा अंक टाकायला गेलो, तेव्हा बघितले आणि तुंगार यांना विचारले, तर ते म्हणाले की माझ्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटायला येणार आहे. बाबासाहेब बहुतेक बौध्द धर्म स्वीकारणार आहे. त्यानंतर त्यांनी स्वीकारला पण त्यासाठी ते तुंगार यांना भेटले होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे येणार होते, तेव्हा न.म. जोशी हे तुंगार यांच्या घराबाहेर सायकल लावून थांबले होते. तेव्हा काही वेळाने मोदी गणपती समोरून एक काळी कलरची गाडी आली. ती तुंगार यांच्याघरासमोर थांबली. त्यातून एक सूटबुटात असलेले व्यक्ती बाहेर आला. तुंगार यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर तुंगार यांनी म्हटले की तो मुलगा तुमच दर्शन घ्यायला थांबला आहे. तेव्हा ते म्हणाले की दर्शन कसले मी काय देव आहे का. ये इकडे आणि मला बोलावले. तेव्हा मी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली. त्यांनी मला विचारले की काय करतो? मी शाळेबरोबर पेपर टाकायचे काम करतो. बाबासाहेबांनी माझ्याकडील अंक घेतला आणि मला आशीर्वाद दिला. तेव्हापासून माझ्या लेखकाच्या खऱ्या प्रवासाला सुरवात झाली, असे यावेळी न.म. जोशी यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर लिहिले पुस्तक : जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर त्यांच्या विचाराने प्रभावित होवून डॉ. न. म. जोशी यांनी 1985 साली बाबासाहेबांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिले. शिवाय जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका इंग्रजी पुस्तकाचे मराठी अनुवादन देखील केले आहे.

हेही वाचा - Nawab Malik Case : मलिकांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.