पुणे: तांबडी जोगेश्वरी ही शहराची ग्रामदेवता आहे. हे मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मुर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते. तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा शंभर वर्षांहून अधिक जुनी आहे. तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दुसरा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन करण्यात येते. दरवर्षी पुन्हा नव्या मूर्तीची स्थापना करण्यात येते. सुरवातीच्या काळात तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या आवारातच गणेशमुर्तीची स्थापना केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या बाहेर भव्य मंडपात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते.
या बाप्पाची मूर्ती पाहिली तर आफ्रिकन हत्तीचा चेहरा असणारी हि एकमेव मूर्ती आहे. ३३ इंच उंच आणि २६ इंच रुंद अशी हि मूर्ती आहे. या मूर्तीची आगमनाची मिरवणूक रथातून तर विसर्जनाची मिरवणूक पालखीतून काढण्यात येते, गेल्या चार पिढ्यांपासून दत्तात्रय कुलुंजकर यांचे कुटुंब गणेशाची मूर्ती साकारत होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हि मूर्ती गिरे कुटुंब बनवत आहे. या ठिकाणची मूर्ती हे तीन महिने अगोदर बनवायला सुरुवात होते ब्रह्म मुहूर्ता वरती चतुर्थीला ही मूर्ती बनवायला सुरुवात करतात कारण ही मूर्ती तेथे सिंचन असते आणि त्याचबरोबर ही मूर्ती वेळ लागतो कारण ही मूर्ती संपूर्णपणे शाडू मातीची असते आणि ही मूर्ती जी आहे ती पूर्ण हातानेच बनवलेली असते त्याचबरोबर या गणपतीची मिरवणूक आहे ती खांद्यावर रथावरच होते त्यामुळे त्याची मूर्तीची उंची ही कमीच ठेवावी लागते.
तांबडी जोगेश्वरी मंदिराची स्थापना १५४५ रोजी त्रिंबक बेंद्रे यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्राम देवता म्हणून ओळखली जाऊ लागली, लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा या उद्देशाने गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या उत्सवात तांबडी जोगेश्वरीला मनाचे दुसरे स्थान मिळाले. तांबडी जोगेश्वरी बाप्पांचा देव्हारा आधी पितळेचा होता आणि काही काळानंतर मंडळाच्या सभासदांनी दिलेल्या देणगीतून चांदीचा देव्हारा बनवला आहे.
यावर्षी मंडळाचे 130 वर्ष असून मंडळाने सुद्धा यावर्षी जोरात तयारी करण्यास सुरुवात केली आहे.दरवर्षी अतिशय पारंपारिक पद्धतीने गणेशाची स्थापना आणि विसर्जन या मंडळाकडून करण्यात येते व सर्व धार्मिक सही मोठ्या उत्साहामध्ये या मंडळातून करण्यात येतात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविकांमध्ये उत्साह आहे तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह असून या वर्षी सुद्धा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून समाज परिवर्तनाचे संदेश सुद्धा यावेळेस मंडळ देणार आहे.
हेही वाचा : Pune Ganesh Festival : पुण्याचे ग्रामदैवत अशी ओळख असलेला मानाचा पाहिला श्री कसबा गणपती