ETV Bharat / city

Schools Reopen : पुणे शहरातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 16 डिसेंबरपासून होणार सुरू - महपौर - Pune Schools Reopen

पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा गुरुवार (दि. 16 डिसेंबर) पासून सुरू ( Schools Reopen ) होतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ ( Mayor Murlidhar Mohol ) यांनी दिली. शाळा सुरू करण्याबाबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्या बैठकीला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ), विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार हेदखील उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ
महापौर मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : Dec 14, 2021, 8:25 PM IST

पुणे - राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबई, पुणे शहरातील स्थानिक प्रशासनाने याला विरोध दर्शवला होता. पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. आता पुणे महापालिका हद्दीतील 1 ली ते 7 वीपर्यंतच्या शाळा गुरुवार (दि. 16 डिसेंबर )पासून सुरू ( Schools Reopen ) करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ ( Mayor Murlidhar Mohol ) यांनी दिली. हा निर्णय पालकमंत्री अजित पवार ( Minister Ajit Pawar ) यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला आहे.

माहिती देताना महापौर मोहोळ

महापालिकेने 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंद करण्याचा घेतला होता निर्णय

राज्य सरकारने एक डिसेंबर रोजी पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओमायक्रॉन विषाणूमुळे ( Omicron Variant ) सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण, शिक्षण विभाग आणि राजेश टोपे यांनी शाळा सुरू होण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली होती. मात्र, मुंबई महापलिककेने या विषाणूचा धोका पाहता शाळा 1 तारखेपासून सुरू होणार नसल्याचे जाहीर केले होते. तर पुणे महापालिकेने 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे सांगितले होते.

काय आहे नियमावली

  1. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ७ वीचे नियमित वर्ग दिनांक १६ डिसेंबर, २०२१ पासून सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
  2. शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील दि.०७ जुलै २०२१, दि. १० ऑगस्ट, २०२१, दि. २४ सप्टेबर, २०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना / अटी ( SOP ) व दिनांक २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी शासन परिपत्रकातील अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
  3. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी इयत्ता १ ली ते ७ वीचे नियमित वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना यासोबत संलग्न केले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
  4. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मामीटर ( Thermometer ), थर्मल स्कॅनर ( Thermal Scanner/Gun ), पल्स ऑक्सिमीटर ( Pulse Oximeter ), जंतुनाशक, साबण, पाणी इत्यादr आवश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यात यावी.
  5. शाळेतील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरणाचे २ मात्रा (डोस) पूर्ण झाले नाहीत, अशा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर ( RT-PCR ) चाचणी बंधनकारक असून त्याबाबतचे प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवण्यात यावे.
  6. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यात यावे.
  7. वर्ग खोली तसेच स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर ( Physical Distance ) च्या नियमा नुसार असावे.
  8. शाळेत दर्शनी भागावर ( Physical Distance ) मास्कचा ( Mask ) वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना लावण्यात यावे. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्यासाठी किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखले जाईल यासाठी विशिष्ट चिन्हांकन करण्यात यावे. शारीरिक अंतर ( Physical Distance ) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणाच्या खुणा करण्यात याव्यात, याबाबतची व्यवस्था शाळेने करणे आवश्यक राहील.
  9. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करून घ्यावी.
  10. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरिता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करण्यात यावा. स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे, याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील.

हे ही वाचा - OBC Reservation : निवडणुका पुढे ढकला, अन्यथा 17 डिसेंबरपासून चक्का जाम आंदोलन; VJNT चा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.