ETV Bharat / city

गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही ? 2024 नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री - संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीसाठी गेले आहेत. त्यावरूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष नेत्यांकडून तर्क - वितर्क लावले जात आहेत. यावरच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात शिवसैनिकांच्या आढावा बैठकीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

sanjay raut
sanjay raut
author img

By

Published : Sep 26, 2021, 8:25 PM IST

Updated : Sep 26, 2021, 8:52 PM IST

पुणे - आज सर्वांचेच लक्ष लागले होते कि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला का गेले आहेत. अनेकांच्या मनात शंका होती. अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते. मात्र मुख्यमंत्री हे परत मुंबईला आले आहेत. ते अमित शहा यांनाही भेटले मात्र त्यांच्यात कोणतीही वैयक्तिक चर्चा झालेली नाही. ज्या शासकीय कामासाठी ते गेले होते तेवढच काम करून आले आहेत. हे सरकार अजून तीन वर्ष चालणार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच तीन वर्ष मुख्यमंत्री असणार आहेत. त्याचबरोबर 2024 नंतर देखील मुख्यमंत्री तेच असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या 105 आमदारांच्या विरोधी पक्षाला या राज्यात कोणत्या प्रकारचे कार्य केलं पाहिजे यासाठी पुण्यासह सगळ्या शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारू, स्वप्न बघण्यावर बंदी आणू, 5 वर्ष खूप स्वप्न आपण पहिली आत्ता बघू नका. कारण तुम्ही कितीही आपटली तरी ठाकरे सरकारचा तुम्ही बाल ही बाका करू शकत नाही, असो सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला हाणला आहे.

शिवसेना पुणे शहर व बारामती लोकसभा पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना संजय राऊत
नाहीतर एकला चलो रे -
आज पुणे महापालिकेत शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला असा आकडा गाठायचा आहे कि, आपल्या शिवाय कोणाचाही महापौर होता कामा नये. एकतर आमचाच होईल अशा पद्धतीने पुढे काम करायचे आहे. अजित पवार पालकमंत्री आहेत. त्यांच्याशी रीतसर बोलणी करू, मोठ्या पवार साहेबांशी बोलू, आघाडी झाली तर उत्तमच आहे. नाहीतर आपण आहोतच एकला चलो रे.. पुणे महापालिकेत आत्ता शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची वेळ ही आलीच आहे, असं देखील यावेळी राऊत म्हणाले.
चंद्रकांत पाटलांकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही -
चंद्रकांत पाटील हे जसं म्हणतात माजी म्हणू नका तसं तुम्हीही माजी मंत्र्यांना माजी म्हणू नका. कारण त्यांची आत्ता पक्षाने नियुक्ती केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याशी माझी मैत्री आहे आणि ती किती आहे हे तुम्ही पाहिलं आहे. त्यांच्यावर मी सव्वा रुपयांचा दावा दाखल केला आहे. फक्त सव्वा रुपया.. म्हणजे या देशाच्या इतिहास सर्वात कमी रुपयांचा लावलेला दावा आहे. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की, माझी किंमत एवढी कमी कशी तर माझी किंमत ही तुम्हाला मोजताच येणार नाही, कारण मी शिवसैनिक आहे. तुमची किंमत मी करत आहे. मला तुमचे 100 कोटी नकोत, मला जगायला बाळासाहेबांनी खूप दिलं आहे. पण मी एक सांगतो सव्वा रुपया तुमच्याकडून घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,असा टोला यावेळी संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

हे ही वाचा -अजित पवार आमचेही ऐकत जा, अन्यथा मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत - संजय राऊत

गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, तर महाराष्ट्राचा का नाही -

या देशांने आपली किंमत पहिली आहे. आज आपले मुख्यमंत्री तुमच्या नेत्यांबरोबर जेवायला बसले होते. तुम्ही कुठे आहात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो त्याला या देशातील सर्वात मोठा नेता म्हणून मान्यता असते. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो. तर महाराष्ट्राचा का नाही. मला कोणी तरी विचारलं कि मुख्यमंत्री हे दिल्लीला का गेले. मी म्हटलं कि ते दिल्ली बघायला गेले होते, कारण दिल्लीत आम्हाला राज्य करायचं आहे. आम्ही जेव्हा म्हणतो दिल्लीत राज्य करायचं तेव्हा दिल्लीत राज्य येतेच, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना रेसचा घोडा आहे
शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका. शिवसेना ही आग आहे आणि आत्ता एकाच सांगेन कि आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला काम करायचं आहे. जसं ते देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून काम कारत आहेत. तंस आपल्याला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे. शिवसेना हा रेसचा घोडा आहे. लावायचा तेव्हा आपण लावतो ना घोडा..मला सांगायला नको मी एक्स्पर्ट आहे त्यात. लोक माझ्याकडून धडे घेतात घोडे लावायचे. मी सगळ्या प्रकारचे घोडे वापरले आहेत. घोडे लावले पण अजून घोड्यावर बसलो नाही, असं देखील यावेळी राऊत म्हणाले.

हे ही वाचा - पुढील पाच दिवस पावसाचे.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अॅलर्ट

प्राण्यांकडून काय अपेक्षा व्यक्त करणार -

पुणे शहरात नगरसेवकांची संख्या वाढली पाहिजे. नव्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. भाकरी ही फिरली पाहिजे आणि यासाठी आपण काम करणे गरजेचे आहे. 2022 ला युवा च्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्या शिवाय तिकिटांची शिफारस पूर्ण होणारच नाही. पत्नीवर अन्याय करू नका महिलांनाही संधी मिळाली पाहिजे भाजपचा एक प्राणी आहे कि ज्याने महिलांशी अपशब्द बोलला आहे. या प्राण्यांकडून अपेक्षाच काय करणार.

Last Updated : Sep 26, 2021, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.