पुणे - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आक्रमक होत बंड आमदारांवर टिका करत आहे. अश्यातच बंड आमदार देखील संजय राऊत यांच्यावर टीका करत आहे. आत्ता शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील आपली भूमिका मांडत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली आहे. ते म्हणाले की, अख्या महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कोणीही जाऊन विचारलं तर ते हेच सांगणार की आज जी ही वेळ आली आहे. ती वेळ संजय राऊत यांच्यामुळेच आली आहे. 56 वर्षाची स्वाभिमानी शिवसेना बारामतीच्या वळचणीला नेहून उभी करण्याचा काम संजय राऊत यांनी केलं आहे. आम्ही त्याचं निषेध करतो, अशी टीका यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. आज पुण्यात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
ते म्हणाले की माझ्यासह पुरंदर तालुक्यातील सर्व शिवसैनिक हे शिवसेना बरोबर आहोत. पण आम्हाला शिवसेना ही महविकास आघाडीत नको आहे. एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका घेतली आहे. ती योग्य आहे. आम्ही सर्वजण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत, अशी भूमिका यावेळी शिवतारे यांनी मांडली आहे.
शिवसेनेला आज जी वेळ आली आहे. ती वेळ कोणामुळे आली आहे, हे एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचार करून पाहावं. शिवसेनेचा खरा शत्रू कोण आहे, हे एकदा त्यांनी पाहावं. कारण 2014 साली जेव्हा राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हाच पवार यांनी शिवसेना ड्यामेज केलं होत, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवतारे यांनी केली आहे.
हेही वाचा - SC On MVA Petition : महाविकास आघाडीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 5 वाजता सुनावणी