ETV Bharat / city

MPSC Result News : एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

author img

By

Published : Apr 30, 2022, 8:57 AM IST

राज्या सेवा परीक्षेचा निकाल लागला आहे. यात 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले ( Sangli Pramod Chowgule came first in MPSC Result ) हा परीक्षेत प्रथम आला आहे. राज्य सेवा ( MPSC Result News ) परीक्षेच्या परीक्षार्थींच्या मुलाखतीचा कार्यक्रम काल संध्याकाळी सहाच्या सुमारास संपला आणि त्यानंतर अवघ्या दीड तासांत या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

Sangli Pramod Chowgule came first in MPSC
एमपीएससी परीक्षा निकाल प्रमोद चौगुले यश

पुणे - राज्या सेवा परीक्षेचा निकाल लागला आहे. यात 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले ( Sangli Pramod Chowgule came first in MPSC Result ) हा परीक्षेत प्रथम आला आहे. राज्य सेवा ( MPSC Result News ) परीक्षेच्या परीक्षार्थींच्या मुलाखतीचा कार्यक्रम काल संध्याकाळी सहाच्या सुमारास संपला आणि त्यानंतर अवघ्या दीड तासांत या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य लोकसेवा आयोगाकडून अशा प्रमुख परीक्षेचा निकाल मुलाखतीनंतर इतक्या तत्परतेने आणि काही तासांत लागण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला आहे. एका अर्थाने ( Maharashtra MPSC News ) राज्य लोकसेवा आयोगाने हा विक्रम केला आहे.

प्रतिक्रिया देताना प्रमोद

हेही वाचा - MNS Maha Aarti : अक्षय तृतीयेला पुण्यात मनसेकडून महाआरती, सर्व हिंदुत्ववादी संघटना होणार सहभागी

प्रमोद चौगुले ( Sangli Pramod Chowgule MPSC Success ) नंतर नितेश नेताजी कदम हा 591 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर, रुपाली गणपत माने हिने 580.25 गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत.

कोविड साथीमुळे प्राथमिक परीक्षेला विलंब झाला होता. त्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाने त्यानंतर वेगाने पावले टाकली. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा संपली. एप्रिलमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतीनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल लागण्याची परंपरा होती. ती परंपरा खंडीत करत मुलाखत संपताक्षणीच निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर होताच प्रमोदच्या मित्रांनी त्याचे स्वागत केले आणि जल्लोष केला. आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा - Pune News : पुढील आठवडाभर राज्यातील पारा चढणार - हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.