पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पक्षाच्या नवीन झेंड्याची घोषणा केली. यानंतर सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसेच्या या नवीन झेंड्यात राजमुद्रा असल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. मनसे विरोधात तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेडने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.