ETV Bharat / city

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड विचाराधीन - उपमुख्यमंत्री - fine against witout mask

महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा विचार आहे. त्याशिवाय नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पळाले पाहिजेत, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Aug 28, 2020, 2:45 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत नागरिक गंभीर नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येईल, असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

अजित पवार
पिंपरी येथे कोव्हिड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अण्णा बनसोडे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आज ही महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा विचार आहे. त्याशिवाय नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाही. सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. फिजिकल डिस्टसिंग ठेवलेच पाहिजे. हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पळाले पाहिजेत, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले.

पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. त्यामुळे शहरामधील नागरिकांना अडचण येऊ नये, त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णाला कुठल्याही प्रकारचा बेड मिळाला नाही, ही वेळ येऊ नये. म्हणून, महानगरपालिकेने हे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयावर प्रशासनाची करडी नजर आहे. कोरोनाचे संकट असताना अशा प्रकारे रुग्णांना अवाजवी बिल नागरिकांना लावू नये, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.