पुणे : शक्ती कायदा विधिमंडळामध्ये (Shakti Bill) पास झाल्यामुळे महिलांसाठी आजचा दिवस दिवाळी दसरा आहे. यामुळे महिला संरक्षणाला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे विकृतांनो वेळेस सावरा. कारण आता शक्ती विधेयक कायदा आला आहे. असे मत राष्ट्रवादीच्या वकील रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केले. बलात्कार किंवा महिलांवरली अत्याचारचा न्याय मिळायला कायद्याला वेळ लागायचा. शक्ती कायद्यामुळे तो न्याय मिळाला आता 21 दिवसाच्या आत मध्ये मिळू शकणार आहे.
या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके आहेत.शक्ती विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये प्रकरणाची चौकशी आणि 30 दिवसांच्या आत अशा प्रकरणांची सुनावणी पूर्ण करावी लागेल. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी या विधेयकात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती. आता मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरून महिलांना किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.
हेही वाचा - शक्ती विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार मंजूर.. विधेयक संयुक्त समितीकडे