ETV Bharat / city

Rupali Chakankar : 'चंद्रकांत दादा ! यापुढे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू नये, याची काळजी घ्या' - राज्य महिला आयोग पत्र चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी राज्य महिला आयोगाला ( State Women Commission ) पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर राज्य महिला आयोगाने पाटील यांना समज दिली आहे. आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी समज आयोगाने दिली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी म्हटले आहे.

रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर
author img

By

Published : May 29, 2022, 7:10 PM IST

Updated : May 29, 2022, 7:44 PM IST

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. यावर आता चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी राज्य महिला आयोगाला ( State Women Commission ) पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर राज्य महिला आयोगाने पाटील यांना समज दिली आहे. आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी समज आयोगाने दिली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर

महिला आयोगाने मागितले होते स्पष्टीकरण : 'घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या', अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या मुद्यावरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. अखेर आज पाटील यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पाठवले आहे.

काय लिहिले आहे पत्रात? : आयुष्याची 45 स्वयंसिद्धा, सावली, आई, संवेदना आणि वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेचे महाराष्ट्रातून 5 महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल आणि महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणींचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दुःख नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. माझ्या ओबीसी बंधू भगिनिंना राजकीय - आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींचा अपमान झाला - असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - Chandrakant Patil Statement : चंद्रकांतदादा माफी मागा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही; रुपाली ठोंबरे पाटलांचा इशारा

Last Updated : May 29, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.