ETV Bharat / city

Nitin Gadkari On RSS : जेव्हा नितीन गडकरींना रतन टाटा म्हणाले, 'हे फक्त हिंदूंसाठीच आहे का?' गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

औरंगाबादेतील एका हॉस्पिटलच्या उदघाटनाला नितीन गडकरींच्या विनंतीवरून उद्योगपती रतन टाटा ( Businessman Ratan Tata ) पूर्वी आले होते. त्यावेळी टाटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रुग्णालय असल्याने ते फक्त हिंदूंचच आहे का? असा सवाल गडकरींना केला होता. त्यावर गडकरींनी त्यांना स्पष्टीकरण दिले ( Nitin Gadkari On RSS ) होते. त्यावेळेसचा हा किस्सा गडकरी यांनी आज पुण्यात सांगितला. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत ( Nitin Gadkari On RSS ) होते.

जेव्हा नितीन गडकरींना रतन टाटा म्हणाले, 'हे फक्त हिंदूंसाठीच आहे का?' गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

author img

By

Published : Apr 14, 2022, 5:19 PM IST

पुणे : नितीन गडकरी राज्यात मंत्री असताना त्यांच्या विनंतीवरून उद्योगपती रतन टाटा ( Businessman Ratan Tata ) औरंगाबादेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हॉस्पिटलच्या उदघाटनाला आहे होते. त्यावेळी टाटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रुग्णालय असल्याने ते फक्त हिंदूंचच आहे का? असा सवाल गडकरींना केला होता. त्यावर हे रुग्णालय सर्वांसाठी असून, आरएसएसमध्ये असे सांगितले जात नसल्याचे टाटांना सांगितले ( Nitin Gadkari On RSS ) होते, अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Central Minister Nitin Gadkari ) यांनी आज पुण्यात बोलताना सांगितली.

नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा : नितीन गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचवेळी मुकुंदराव पणशिकर नावाचे गृहस्थ संघाचे प्रचारक होते. त्यांनी गडकरींजवळ आग्रह धरला की, या हॉस्पिटलचे उद्घाटन हे रतन टाटा यांच्या हस्ते करायचं आहे. त्यांच्या सांगण्यावरून नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्तव रतन टाटा हे स्वतः औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. पण विमानातून उतरताच रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांना 'ये हॉस्पिटल केवल हिंदू समाज के लिये है क्या?' असा प्रश्न विचारला. त्यावर गडकरी यांनी, 'तुम्हाला असं का वाटतं?' असं त्यांना विचारलं. रतन टाटा म्हणाले की, 'हे संघाचे हॉस्पिटल आहे म्हणून विचारलं'. पण गडकरी यांनी असं नाही असं सांगत, हे सर्व समाजासाठी असल्याचं सांगितले. सांगत संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

जेव्हा नितीन गडकरींना रतन टाटा म्हणाले, 'हे फक्त हिंदूंसाठीच आहे का?' गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत - गडकरी : त्याचबरोबर या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातल्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे. देशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत, अशी खंत गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली. विशेषतः ग्रामीण भागात ही परिस्थिती अतिशय बिकट आहे, असं सांगत ग्रामीण भागात शिक्षणासाठी शिक्षक, शाळेची बिल्डिंग, तर कुठे विद्यार्थी नाहीत. सगळं असेल तर तिथं शिक्षण नाही, अशी मिश्किल टिप्पणी देखील केली.

हेही वाचा : देशात काँग्रेस पक्ष मजबूत व्हायला हवा - नितीन गडकरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.