ETV Bharat / city

Road Accident at Narayanpur : एमआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कारचा नारायणपूरमध्ये भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू - एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अपघात

नारायणपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा पलटी खात अपघात झाला (Road Accident at Narayanpur) आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून  पाच जण जखमी झाले (Accident at Narayanpur Two died and Five injured) आहेत.

Road Accident at Narayanpur
नारायणपूर येथे रस्ता अपघात
author img

By

Published : Oct 4, 2022, 10:55 AM IST

Updated : Oct 4, 2022, 11:28 AM IST

पुणे : नारायणपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीचा पलटी खात अपघात झाला (Road Accident at Narayanpur) आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले (Accident at Narayanpur Two died and Five injured) आहेत.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात - चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात तेथीलच मेघमल्हार टि हाउस व शिवलक्ष्मी दुकानाला धडक देवून गाडी उलटी झाली. अपघात ऐवढा भीषण होता की, गाडी धडकून वाहनाचा जागीच चक्काचूर झाला होता. नारायणपूरचे स्थानिक नागरीक भानुदास बोरकर, रामभाउ बोरकर, सचिन झेंडे, भरतनाना क्षिरसागर यांनी तात्काळ जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून सासवड ग्रामीण रूग्णालय येथे उपचारकामी दाखल (students of MIT college Pune) केले.

नारायणपूर येथे रस्ता अपघात

दोघांचा जागीच मृत्यू - त्यातील रचित मोहता (वय १८ वर्षे, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल), व गौरव लालवानी (वय १९ वर्षे, रा रायपूर, छत्तिसगढ़) यांना डॉक्टरांनी दाखलपूर्व मयत घोषित केले. तर इतर पाच जणांना पुढील उपचारकामी ससून रुग्णालयात हलवले. त्यापैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ससुन रूग्णालयात उपचार चालू आहेत. अपघात झालेले विद्यार्थी हे विविध राज्यातील असून ते पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत (Accident of students of MIT college Pune) आहेत.

नारायणपूर येथील सासवड - कापूरहोळ रस्त्यावरील दत्तमंदीराशेजारी एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Oct 4, 2022, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.