पिंपरी-चिंचवड (पुणे) - हिंजवडी वॉर्ड क्र2 मधून रेखा संदीप साखरे बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यांची आय टी हब हिंजवडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. रेखा साखरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
आयटी हब हिंजवडीचे उपसरपंच पद रेखा साखर यांच्याकडे -
मनीषा हुलावळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामविकास अधिकारी तुळशीराम रायकर व सरपंच गणेश जांभुळकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली आणि सरपंच व सदस्यच्या सहकार्याने हिंजवडी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून उपसरपंच पदाला योग्य न्याय देण्याचे काम पुढील काळात करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच रेखा यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.
पतीचा अनुभव नक्कीच फायदा होणार हे नक्की -
रेखा साखरे यांचे पती हे श्री म्हातोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि म्हातोबा उत्सव कमिटी हिंजवडीच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे. त्यामुळे पती संदीप साखरे त्याच्या अनुभवाचा रेखा साखरे यांना नक्कीच फायदा होणार आहे असे मत तानाजी हुलावळे यांनी व्यक्त्य केले.