ETV Bharat / city

Record sugar production : राज्यात यंदा 100 वर्षांतील विक्रमी साखर उत्पादन, अतिरिक्त उसाचा प्रश्न संपल्याचा दावा

तब्बल 240 दिवस लांबलेला ऊस गाळप हंगाम अखेर आज संपला. याबरोबरच राज्यातला अतिरिक्त ऊसाचा प्रश्नही संपला असल्याचा दावा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला. राज्यात यंदा 100 वर्षांतील विक्रमी 137.27 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली.

Record sugar production in the maharashtra
अतिरिक्त ऊस समस्या महाराष्ट्र
author img

By

Published : Jun 16, 2022, 12:26 PM IST

पुणे - तब्बल 240 दिवस लांबलेला ऊस गाळप हंगाम अखेर आज संपला. याबरोबरच राज्यातला अतिरिक्त ऊसाचा प्रश्नही संपला असल्याचा दावा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला. राज्यात यंदा 100 वर्षांतील विक्रमी 137.27 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. ऊस गाळप हंगाम २०२१ - २२ अनुषंगाने माहिती देण्यासाठी आज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

माहिती देताना साखर आयुक्त

हेही वाचा - महागाई आंदोलनातील पालेभाज्या कार्यकर्त्यांच्या स्टॉलवरील, त्या परत विकल्या जाणार - प्रदीप देशमुख

राज्यातील 200 पैकी 198 साखर कारखाने बंद झाले आहेत. तर 1 हजार 320 लाख टन उसाचे यशस्वी गाळप करण्यात आले आहे. आतापर्यंत 137.27 लाख टन साखर तयार झाली आहे. कोल्हापूर विभागातील सर्व म्हणजे 36, पुणे विभागातील 30 पैकी 29, सोलापूर विभागातील 47, नगर विभागातील 28, तर औरंगाबाद विभागातील 25 पैकी 24 साखर कारखाने बंद झालेले आहेत. नांदेडमधील सर्व म्हणजे 27, अमरावतीमधील 3 तर नागपूरमधील चारही कारखाने बंद झालेले आहेत.

पुढच्यावर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सँटलाईट इमेज मार्फत आणि स्वतंत्र ऑनलाईन अॅप मार्फत ऊसाची नोंद केली जाणार आहे. राज्यात दिवसेदिवस ऊसाचे क्षेत्र वाढत जात असून यावर्षी 1320.31 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तसेच, इथेनॉल निर्मिती करण्याकडे लक्ष दिल्याने देशातील साखरेला परदेशातही मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा होत आहे. राज्यात ऊस गाळप चांगल्या पद्धतीने झाले असून 137.27 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यावर्षी 240 दिवस कारखाने सुरू होते, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात. या हंगामात महाराष्ट्रात १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. यातून १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागात झाले, असे देखील यावेळी गायकवाड म्हणाले.

यावर्षी ऊसाचे क्षेत्र हे 11.42 लाख हेक्टरवरून 13.67 लाख हेक्टर झाले आहे. तसेच, ज्या चार कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना दर दिला नाही त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. इथेनॉलच्या बाबतीत राज्यातील कारखाने आता ब्राझीलच्या बरोबरीने इथेनॉल उत्पादित करण्याकडे प्रयत्न करत असून वार्षिक 264 कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादित केले जाईल. ऊस नोंदणीसाठी अॅप तयार केले असून ई पीक पाहणीव्दारे सातबारावर पिक नोंदणीस प्रोत्साहन दिले जाईल, अस देखील यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

राज्यात आता राजगड सहकारी साखर कारखाना (अनंतनगर, ता. भोर) व संत मुक्ताईनगर शुगर अॅड एनर्जी (घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) यासह औरंगाबाद विभागातील एक कारखाना अजून काही दिवस चालू राहण्याची शक्यता आहे. नियोजनाप्रमाणे राज्यातील सर्व उसाचे गाळप झालेले आहे. मराठवाड्यासह आता कोणत्याही भागात गाळपाविना ऊस शिल्लक नाही. काही भागातील उर्वरित ऊस गाळण्यासाठी दोन कारखाने पुढील 2-3 दिवस चालू राहणार आहे.

हेही वाचा - Pune Congress Agitation : राहुल गांधीच्या ईडी चौकशीविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक; टायर पेटवत केले आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.