पुणे - शहरात पूर्वी अनेक खनिजे ( Minerals ) मिळत असत. ते आजही विविध ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक खनिजे आज याच पुण्यातील असून ते देश विदेशातील अनेक म्युझियममध्ये पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा एक खनिज ज्याचे नाव आहे कॅव्हेंनसाईट ( Cavansite Minerals ). हा कॅव्हेंनसाईट खनिज पूर्वी पुण्यातील वाघोली ( Wagholi in Pune ) येथे होत असलेल्या खाणकामात सापडला होता. त्याची ओळखही तशीच निर्माण झाली. जगात कुठेही कॅव्हेंनसाईट बघितले तर ते पुण्याचेच तेही वाघोली येथील असल्याचे अनेकांना पाहायला मिळाले. अशाच पुण्यातील रणजित घाडगे ( Ranjit Ghadge ) हे जेव्हा इंग्लंडमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी लंडन नॅचरल हिस्ट्री ( London Natural History ) येथे भेट दिली. तेथे कॅव्हेंनसाईट पाहिले आणि त्याखालील पट्टी वाचली तर हे पुण्यातील वाघोली येथील खाण कामाचे असल्याचे निदर्शनास आले. कॅव्हेंनसाईट हे जगात दोन ठिकाणीच मिळत असून जास्त प्रमाणात ते पुण्यात सापडत होते.
1988 साली कॅव्हेंनसाईट खनिज सापडले
कॅल्शियम, व्हेनिडियम आणि सिलिकेट या तीन शब्दांपासून कॅव्हेंनसाईट हे नाव तयार झालेले आहे. म्हणून त्याला कॅव्हेंनसाईट असे म्हणतात. पूर्वी पुण्यातील वाघोली येथे मोठ्या प्रमाणात खानकाम होत होते. त्याकाळी 40 ठिकाणी खाणकाम होत होते. तेव्हा तेथील 4 ठिकाणी त्याकाळी कॅव्हेंनसाईट हे खनिज सापडले. 1988 साली पुण्यातील वाघोली येथे पहिल्यांदा हे कॅव्हेंनसाईट खनिज सापडले. कॅव्हेंनसाईट हे पुण्यातील मनाचा एक तुरा आहे, असे देखील यावेळी रणजित घाडगे यांनी सांगितले.
कॅव्हेंनसाईट हे दिसायला अतिशय सुंदर
कॅव्हेंनसाईट हे दिसायला अतिशय सुंदर असून त्यावर निळ्या रंगाचा आणि खाली पांढऱ्या रंगाचा असा सुंदर कॅव्हेंनसाईट असतो. अमेरिकेतील ऑरेंगॉन येथे हे कॅव्हेंनसाईट मिळत असत. याला जेमोलॉजी म्हणून जे म्हटले जात किंवा रत्नशास्त्रमध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच प्रेम आकर्षित करण्यासाठी देखील याच वापर केला जातो, असे देखील सांगितले जाते. हे अतिशय दुर्मिळ असून याची किंमतही जास्त आहे, असे देखील यावेळी रणजित घाडगे यांनी सांगितले.
हेही वाचा - MHADA Paper Leak : पेपरफुटीसाठी आरोपींनी केला होता 'या' कोडवर्डचा वापर; वाचा संपूर्ण प्रकरण...