ETV Bharat / city

खळबळजनक.. एसीपी असल्याचे सांगून पुण्यात शिक्षिकेवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - पुण्यात महिलेवर बलात्कार

पुण्यात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एका 38 वर्षीय शिक्षिकेवर निवृत्त एसीपीने बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विकास अवस्ती असे आरोपीचे नाव आहे.

Rape of a woman teacher
Rape of a woman teacher
author img

By

Published : Sep 12, 2021, 7:23 PM IST

Updated : Sep 12, 2021, 7:42 PM IST

पिंपरी-चिंचवड - पुण्यात आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एका 38 वर्षीय शिक्षिकेवर निवृत्त एसीपीने बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विकास अवस्ती असे आरोपीचे नाव आहे. शिक्षिकेला व्याजाने पैसे हवे होते. ते घेण्यासाठी आरोपीने तिला घरी बोलावले. तिथे पीडित महिलेच्या चेक आणि कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. महिलेला सॉफ्ट ड्रिंक प्यायला देऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पीडित महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश प्रकरणाची माहिती देताना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली असून पीडित महिला शिक्षिका आहे. त्यांना व्याजाने पैसे हवे होते. ते आरोपी अवस्ती देणार होता. त्याने शिक्षिकेला घरी बोलावले अन् कोऱ्या कागदावर आणि चेकवर सह्या घेतल्या. नंतर, सॉफ्ट ड्रिंक प्यायला देऊन थेट बळजबरी करत बलात्कार केला. या घटनेमुळे पीडिता अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. दरम्यान, आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढले आहेत.

हे ही वाचा -सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला झटका.. ओबीसी आरक्षणाचा पेच वाढला, भाजपकडून तीन महिन्यांचा अल्टीमेटम

आरोपी अवस्ती हा पीडित शिक्षिकेच्या शाळेत पोहचला व तिथे शिक्षिकेला विवस्त्र अवस्थेतील फोटो दाखवून बदनामी करण्याची धमकी देत पुन्हा शिक्षिकेला घरी बोलावून बलात्कार केला आहे. मी एसीपी आहे माझे कोणी काही करू शकत नाही, या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या घरच्यांना जीवे मारेन, अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. दरम्यान, अवस्ती हा एसीपी नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. महिलेला घाबरवण्याकरिता त्याने अशी बतावणी केल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा - अशोक चव्हाण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहतील, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य - प्रताप पाटील-चिखलीकर

Last Updated : Sep 12, 2021, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.