पुणे - रौप्य महोत्सवात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 13वा राम कदम कलागौरव पुरस्कार गायक व संगीतकार शंकर महादेवन ( Kalagaurav Award To Shankar Mahadevan ) आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे ( Singer Rahul Deshpande ) यांना दिला जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रावादीचे शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे निमंत्रक व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
असं असेल पुरस्काराचं स्वरुप -
या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा 10 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता
बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील असणार आहेत. उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया आणि राम कदम यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. संगीतकार राम कदम यांच्या नावाने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 2006 पासून राम कदम कलागौरव पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.